Satyendar Jain sarkarnama
देश

Satyendar Jain: AAP च्या माजी मंत्र्याचा पाय आणखी खोलात! CCTV गैरव्यवहारात ACBची मोठी कारवाई

कामाला विलंब लागल्याने कंपनीला 16 कोटी रुपयांचा दंड ठोठवण्यात आला होता. कंपनीला हा दंड माफ करण्यासाठी सत्येंद्र जैन यांनी 7 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.

Mangesh Mahale

दिल्ली विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झालेल्या आम आदमी पक्षाच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. आम आदमी पक्षाचे माजी मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain)यांच्या विरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.

सीसीटीव्ही योजनेत 571 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. उपराज्यपालांकडून परवानगी मिळाल्यानंतर एसीबीने ही कारवाई केली आहे.

काय आहे आरोप

दिल्लीतील 70 विधान सभा मतदारसंघात 1.4 लाख सीसीटीव्ही बसविण्यात येणार होते, या योजनेसाठी भारत इलेक्ट्रानिक्स लिमिटेड (BEL)कंपनीला हे काम देण्यात आले होते. पण कामाला विलंब लागल्याने कंपनीला 16 कोटी रुपयांचा दंड ठोठवण्यात आला होता. कंपनीला हा दंड माफ करण्यासाठी सत्येंद्र जैन यांनी 7 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.

याबाबत मनमोहन पांडे यांनी केलेल्या तक्रारीवरुन एसीबीने ही कारवाई केली आहे. जैन यांच्यावर कारवाई करण्यासाठी एसीबीने उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्याकडे परवानगी मागितली होती. उपराज्यपालांनी परवानगी दिल्याने एसीबीने जैन यांच्या विरोधात भ्रष्टाचार कायद्यानुसार कलम 17 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

16 कोटी रुपयांचा दंड माफ

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जून 2020 मध्ये ईडीने जैन यांना अटक केली होती. ते सध्या जामिनावर आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. बीईएल कंपनीच्या 16 कोटी रुपयांचा दंड माफ करण्यासाठी जैन यांनी 16 कोटी रुपयांची लाच घेतली, असे एससीबीचे आयुक्त मधुर कुमार वर्मा यांचे म्हणणं आहे. या प्रकरणात अनेक गैरव्यवहार झाल्याचे तपासात आढळले आहे.

सीसीटीव्ही योजना राबविण्याची जबाबदारी तत्कालीन मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर होती. जैन यांच्याविरोधात तक्रार आल्यानंतर सर्वात पहिले बीईएलचे अधिकारी जितेंद्र कुमार यांनी चौकशी करण्यात आली. 23 आँगस्ट 2019 रोजी जैन यांनी याप्रकरणी लाच घेतल्याची माहिती समोर आली.

लाच घेतल्याचा आरोप

बीईएल कंपनीला 1.4 लाख सीसीटीव्ही बसविण्याचे कंत्राट मिळाले होते. हे काम ठरवलेल्या वेळेत पूर्ण करु शकली नाही, त्यामुळे कंपनीला दंड ठोठवण्यात आला. दंड रद्द करण्यासाठी ठेकेदारांकडून जैन यांनी लाच घेतल्याचा आरोप आहे. सीसीटीव्ही कॅमेरे निष्कृष्ट दर्जाचे होते, ठेकेदारांना दोन वेळा कामाचे मुदत वाढवून देण्यात आली होती. लाचेची रक्कम विविध ठेकेदारांकडून जैन यांना देण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT