Karnataka Politics: होऊ दे खर्च! 'हवाई सफरी'वर मुख्यमंत्र्यांची कोटींच्या कोटी उड्डाणे; जनतेच्या पैशांची उधळपट्टी!

Karnataka CM Siddaramaiah Flight Expenses: मुख्यमंत्र्यांनी मैसूर सारख्या जवळच्या शहरासाठीही हेलीकॉप्टरचा वापर करण्यात आला असल्याचे उघड झाले आहे. बंगलुरु ते मैसूर हे दीड तासाच्या अंतरासाठीही हेलीकॉप्टरचा वापर मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
Karnataka CM Siddaramaiah Flight Expenses:
Karnataka CM Siddaramaiah Flight Expenses:Sarkarnama
Published on
Updated on

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची विमान यात्रा सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. मुख्यमंत्री अन् त्यांच्या कुटुंबियांनी करदात्या जनतेच्या पैशांतून केलेल्या 'हवाई सफरी'चा खर्च समोर आला आहे. खर्चांची आकडेवारी पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कर्नाटक सरकारनेच प्रसिद्ध केलल्या माहितीनुसार 2023-2024 मध्ये सिद्धरामय्या यांच्या हेलीकॉप्टर यात्रेवर 12.65 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.तर 2024-2025च्या तुलनेत 15 जानेवारीपर्यंत हा खर्च 19.35 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

विधिमंडळ सभागृहात सादर करण्यात आलेल्या या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी मैसूर सारख्या जवळच्या शहरासाठीही हेलीकॉप्टरचा वापर करण्यात आला असल्याचे उघड झाले आहे. बंगलुरु ते मैसूर हे दीड तासाच्या अंतरासाठीही हेलीकॉप्टरचा वापर मुख्यमंत्र्यांनी केला आहे. रस्त्याने हे अंतर खूप जवळ आहे. मैसूरला जाण्यासाठी 10.85 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

Karnataka CM Siddaramaiah Flight Expenses:
Rashmi Karandikar: महाराष्ट्रातील IPS अधिकारी अडचणीत; गुन्हे शाखेकडून दुसऱ्यांदा समन्स

सिद्धरामय्या यांनी दिल्ली-चैन्नई यासारख्या शहरासाठी चार्टर विमानाचा वापर केला आहे. त्यांच्या खर्च सर्वाधिक आहे. दिल्लीसाठीच्या चार्टर फ्लाइटसाठी 44-40 लाख रुपये खर्च आला आहे, दुसरीकडे बिजनेस क्लासच्या तिकीटासाठी 70 हजार रुपये आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या हवाई यात्रेसाठी केलेल्या उधळपट्टीवर विरोधक आक्रमक झाले आहेत. जेडीएसचे नेता टीएन जावरायगौड़ा यांनी या खर्चावर मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

Karnataka CM Siddaramaiah Flight Expenses:
Sanjay Mishra: भाजपचं धक्कातंत्र; जिल्हाध्यक्षांची खुर्ची पुसणारा त्याच खुर्चीवर झाला विराजमान!

मुख्यमंत्र्यांच्या विमान यात्रेवरुन भाजपने त्यांना धारेवर धरले आहे. भाजप नेता राजीव चंद्रशेखर यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. "राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी निधीची अधिक तरतुद न करता आपल्या विमान यात्रेवर ते असे पैसे उधळत आहेत," असे चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com