दक्षिण दिल्लीतील कैलाश हिल्स परिसरात घडलेल्या एका धक्कादायक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. आयआरएस अधिकाऱ्याच्या 22 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पोस्टमॉर्टम अहवाल समोर आल्यानंतर अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय आरोपी राहुल मीणा हा यापूर्वी त्या कुटुंबात घरकाम करणारा नोकर होता. त्याने दुसऱ्या चावीच्या मदतीने घरात प्रवेश केला आणि थेट छतावरील अभ्यासिकेत गेला. तेथे त्याने तरुणीवर हल्ला करत तिच्यावर अत्याचार केला. घटनेदरम्यान दोघांमध्ये जोरदार झटापट झाल्याचे पुरावे मिळाले आहेत.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था दिल्ली येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार, मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा, खरचटणे आणि सूज आढळली. दोन्ही हात, पाय आणि बाहूंवर संघर्षाचे स्पष्ट चिन्ह दिसून आले, ज्यावरून पीडितेने स्वतःचा बचाव करण्यासाठी जोरदार प्रयत्न केला होता हे स्पष्ट होते. तिच्या चेहऱ्यावरही गंभीर जखमा होत्या आणि नाकाची हाडे तुटलेली आढळली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने प्रथम जड वस्तूने वार करून तरुणीला बेशुद्ध केले आणि त्यानंतर मोबाईल चार्जिंग केबलने गळा आवळून तिची हत्या केली. शवविच्छेदनात गळ्याच्या आतील स्नायूंना गंभीर इजा झाल्याचे आढळले असून मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याची पुष्टी झाली आहे.
या घटनेनंतर आरोपीने वारंवार आपले जबाब बदलले आहेत. त्याला घटनेनंतर काही तासांतच द्वारका येथील हॉटेलमधून अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याबद्दल कोणतीही खंत नसल्याचेही समोर आले आहे.
न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीने आपली चूक मान्य करत माफी मागितली. न्यायालयाने त्याला 4 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. तपासादरम्यान आरोपीने सांगितले की, घरातील लॉकर उघडण्यासाठी पीडितेच्या बोटांचे ठसे मिळवण्याच्या उद्देशाने त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले.
या अमानुष घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.