Ashok kharat land scam : 4 कोटींची जमीन 58 लाखांत लाटली; अशोक खरातचा नवा कारनामा उघड

land scam investigation : अशोक खरात यांचा धक्कादायक जमीन घोटाळा समोर आला आहे. 4 कोटींची जमीन केवळ 58 लाखांत विकत घेतल्याचा आरोप. सविस्तर बातमी वाचा.
Ashok Kharat fake captain fraud case update
Ashok Kharat fake captain fraud case updateSarkarnama
Published on
Updated on

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहेत. आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांच्या तपासातून खरातच्या नव्या जमीन व्यवहाराचा तपशील उघड झाला असून, या व्यवहारामुळे मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उरण परिसरातील चाणके येथे खरातने केवळ 58.50 लाखांत जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या जमिनीचा प्रत्यक्ष बाजारभाव 3 ते 4 कोटींच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात असल्याने एवढ्या कमी किमतीत हा व्यवहार कसा झाला, यावरून संशय अधिकच गडद झाला आहे.

Ashok Kharat fake captain fraud case update
Ashok Kharat case New Update : अशोक खरात प्रकरणात नाशिकमधील 'प्रसिद्ध' डॉक्टरची एन्ट्री; धक्कादायक कनेक्शन समोर

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या दिवशी खरातला अटक झाली, त्याच दिवशी म्हणजे 17 मार्च रोजी या व्यवहाराची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. विशेष म्हणजे, तो कोठडीत असतानाच अवघ्या महिन्याभरात 13 एप्रिल रोजी या जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तपासादरम्यान खरातचा ‘तिसरी मुंबई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील प्रकल्पांवर लक्ष असल्याचेही समोर आले आहे. याआधी पुणे आणि सोलापूरमधील त्याचे व्यवहारही चर्चेत आले होते.

दरम्यान, या प्रकरणात खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याची विशेष तपास पथकाकडून पुन्हा चौकशी करण्यात आली. फरार असलेल्या कल्पना खरातबद्दल माहिती मिळवण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्यात आले होते. खरातच्या मालमत्तांमध्ये वारस म्हणून हर्षवर्धनचे नाव असल्यामुळे त्याला व्यवहारांची माहिती होती का, यासंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले. मात्र, या सर्व व्यवहारांबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्याने सांगितल्याचे समोर आले आहे. चौकशीनंतर त्याला सोडण्यात आले.

Ashok Kharat fake captain fraud case update
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात चाकणकरानंतर दुसरी विकेट पडली; 15000 पतसंस्थांचं जाळं असलेल्या फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा नेत्यानं दिला राजीनामा

सध्या अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात येणार असून, महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये त्याच्यावर कारवाई सुरू आहे. पाचव्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर सहाव्या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाने पुन्हा त्याचा ताबा घेतला आहे. या प्रकरणात अधिक चौकशीसाठी पोलिसांकडून न्यायालयाकडे पुन्हा कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com