K Kavitha Sarkarnama
देश

Delhi Liquor Scam Case : केसीआर यांच्या आमदार मुलीला ‘सीबीआय’कडून अटक

Rajanand More

New Delhi News : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आमदार के. कविता यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात (Delhi Liquor Scam Case) आज कविता यांना सीबीआयने अटक केली आहे. सध्या त्या तिहार तुरूंगात असून तिथूनच सीबीआयने त्यांना अटक केली. मागील आठवड्यात शनिवारी सीबीआयने त्यांची सहा तास चौकशी केली होती.

कविता (K Kavitha) यांना मागील महिन्यात ईडीने अटक केली होती. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनाही ईडीने अटक केली. तेही सध्या तिहार जेलमध्ये आहेत. त्यांनी अटकेविरोधात दाखल केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. आता त्यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे.

कविता यांना 15 मार्चला ईडीने अटक केली होती. त्यांना 26 मार्चला दिल्लीतील राउज एव्हेन्यू कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीबीआयने त्यांची शनिवारी चौकशी केली होती. त्यासाठी कोर्टाने त्यांना परवानगी दिली होती. या चौकशीनंतर सीबीआयने (CBI त्यांच्यावर आज अटकेची कारवाई केली आहे.

सीबीआयकडून उद्या कविता यांना न्यायालयात हजर केले जाऊ शकते. कोर्टात सीबीआय कोठडीची मागणी केली जाईल. ईडीपाठोपाठ सीबीआयची कोठडीही दिल्यास कविता यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. दक्षिणेतील मद्य लॉबीचा यामध्ये सहभाग असल्याचा दावा तपास यंत्रणांकडून केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, या प्रकरणात केजरीवालांसह आपचे नेते मनिष सिसोदिया सध्या जेलमध्ये आहेत. तर खासदार संजय सिंह यांना काही दिवसांपुर्वीच जामीन मिळाला आहे. तर केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे मद्य घोटाळा प्रकरणही चांगलेच गाजत आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT