New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विविध क्षेत्रातील लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची भेट घेतली होती. त्यांनी अमेरिकेतील प्रसिध्द न्यूजवीक या नियतकालिकालाही मुलाखत दिली. आता त्यांनी देशातील सात लोकप्रिय गेमर्सची भेट घेत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्याचे समोर आले आहे. या टीझर भाजपकडून प्रसिध्द करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींनी अनिमेष अग्रवाल, नमन माथूर, मिथिलेश, पायल धारे, तीर्थ मेहता, गणेश आणि अंश बिस्ट यांची भेट घेतली आहे. भाजपने (BJP) प्रसिध्द टीझरमध्ये हे सर्वजण पंतप्रधानांसोबत दिसत आहेत. त्यांना आलेले अनुभव, काही किस्से, काही गेम खेळताना पंतप्रधान मोदी, एकमेकांमधील मनमोकळा संवाद असे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.
गप्पा सुरू असतानाच पंतप्रधान मोदी हसत हसत म्हणतात की, ‘आपणही मॅच्यूअर दिसावे, यासाठी ते केसांना पांढरा रंग लावतात.’ त्यावर गेमर्समध्येही हशा पिकतो. पंतप्रधानांसोबत गप्पा मारताना त्यांच्या आणि आमच्या वयात एवढं अंतर आहे, असे वाटले नसल्याची भावना गेमर्सकडून व्यक्त करण्यात आली. अत्यंत खुल्या वातावरणात ही भेट झाल्याची भावना ते व्यक्त करताना टीझरमध्ये दिसत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान मोदी आणि गेमर्सच्या (Top Gamers in India) या भेटीचा व्हिडिओ 13 एप्रिलला सकाळी साडे नऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे. या गेमर्सच्या फॉलोअर्सची कोटींमध्ये संख्या आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही आता या व्हिडिओ उत्सुकता लागली असेल.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी मोदींकडून हा व्हिडिओ तयार करण्यात आल्याची चर्चा आहे. गेमर्सच्या फॉलोअर्समध्ये लहान मुलांसह लाखो तरुणांचाही समावेश आहे. त्यामुळे आता व्हिडिओ प्रसिध्द झाल्यानंतर त्यावर काय प्रतिक्रिया उमटतात, हे लवकरच समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.