Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal News : जेलमध्ये केजरीवालांची तब्येत बिघडली; 4.5 किलो वजन झाले कमी

Rajanand More

New Delhi News : कथित मद्य घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News) यांची तब्येत बिघडल्याचा दावा आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. त्यांचे वजन काही दिवसांतच साडेचार किलोने कमी झाल्याचे नेत्यांकडून सांगितले जात आहे. त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही स्थिर नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, जेल प्रशासनाने मात्र आप नेत्यांचे हे दावे फेटाळून लावले आहेत.

केजरीवालांना मनी लाँर्डिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तिहार जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. त्याआधी काही दिवस ते ईडीच्या (ED) कोठडीत होते. त्यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

तिहार जेल प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल जेलमध्ये आले तेव्हा त्यांचे वजन जवळपास 55 किलो होते. आताही त्यांचे वजन फारसा फरक पडलेला नाही. सध्यातरी त्यांची तब्बेत ठणठणीत आहे. साखरेची पातळीही सामान्य असून, त्यांनी आज सकाळीच योगा आणि ध्यानधारणाही केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केजरीवालांना दुपारी आणि रात्री घरचे जेवण दिले जात आहे. त्यांच्या तब्येतीवर सातत्याने लक्ष दिले जात आहे. कोणतीही आपत्कालीन स्थिती उपस्थित झाल्यास त्यांच्या कोठडीजवळच क्वीक रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात आल्याची माहिती जेलमध्ये अधिकाऱ्यांनी दिली.

केजरीवाल सहकार्य करत नाहीत

केजरीवाल हे चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचा दावा ईडीने दोन दिवसांपूर्वी कोर्टात केला होता. त्यांना सोडण्यात आल्यास तपासात अडथळे निर्माण करू शकतात. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. आज दिल्ली उच्च न्यायालयात (High Court) केजरीवालांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. ईडीच्या अटकेविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT