Lok Sabha Election 2024 : गुलाम नबी आझाद लोकसभेच्या मैदानात; कोणता मतदारसंघ? वाशीममधून लढली होती पहिली निवडणूक...

Ghulam Nabi Azad News : गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नवीन पक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे त्यांची ही पहिली परीक्षा ठरणार आहे.
Ghulam Nabi Azad
Ghulam Nabi AzadSarkarnama

Jammu and Kashmir News : जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री, डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024 ) लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर ते लोकसभेच्या मैदानात दिसणार आहेत. ते जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आझाद यांनी लोकसभेची पहिली निवडणूक महाराष्ट्रातील वाशीम मतदारसंघातून लढवून ती जिंकलीही होती.

गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी ऑगस्ट 2022 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नवीन पक्षाची स्थापना केली. आता ही निवडणूक त्यांच्या पक्षाची पहिलीच निवडणूक असून, त्यामध्ये आपली ताकद आजमावण्याचा निर्णय आझाद यांनी घेतला आहे. पुढील काही महिन्यांत राज्यात विधानसभेचीही निवडणूक (Assembly election) होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने त्यांनी पक्षाचे उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवल्याचे मानले  जात आहे.

Ghulam Nabi Azad
Delhi Liquor Scam Case : ‘आप’ला मोठा दिलासा; मोदी सरकारला भिडणाऱ्या नेत्याची तुरुंगातून होणार सुटका

अनेक वर्षांनंतर मैदानात

आझाद यांनी लोकसभेची पहिली निवडणूक 1980 मध्ये महाराष्ट्रातील वाशीम लोकसभा मतदारसंघातून लढवली होती. या निवडणुकीत ते विजयीही झाले होते. त्यानंतर 1985 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर ते 2022 पर्यंत राज्यसभेचे खासदार होते. विशेष म्हणजे दोनदा महाराष्ट्रातूनच (Maharashtra)  ते राज्यसभेवर गेले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी विविध मंत्रिपदांवरही काम केले आहे. ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते. जम्मू आणि काश्मीर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांना संधी मिळाली. राज्यात २००५ मध्ये राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

सोनिया गांधींचे विश्वासू नेते म्हणून आझाद यांची ओळख होती. मात्र, पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे मानले जाते. त्यानंतर त्यांनी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी या पक्षाची स्थापना केली. आगामी लोकसभा निवडणूक ही त्यांची पहिलीच निवडणूक आहे.

R

Ghulam Nabi Azad
Lok Sabha Election 2024 : शर्मिला, तारिक अन्वर यांना काँग्रेसचे तिकीट; अमेठी, रायबरेलीत कुणाला उमेदवारी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com