Delhi MCD Election
Delhi MCD Election  Sarkarnama
देश

Delhi Political News : दिल्लीचा महापौर, उपमहापौर आज ठरणार; उपराज्यपालांनी बोलावली बैठक

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : दिल्ली आपच्या महापौर पदाच्या उमेदवार डॉ. शैली ओबेरॉय यांनी दिल्ली महापौरपदाची निवडणूक व्हावी यासाठी ही याचिका दाखल केली होती. दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये ६ जानेवारीला सभागृहात मोठा गोंधळ झाल्याने महापौर पदाची निवडणूक झाली नव्हती. 24 जानेवारीलाही गोंधळामुळं निवडणूक झाली नव्हती. मात्र, उपराज्यपालांच्या आदेशानुसार ही निवडणूक आज ( दि.६ फेब्रु) होत आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी दिल्लीच्या उपराज्यपालांनी बैठक बोलावली आहे.

दिल्ली महानगरपालिकेचा महापौर (Mayor) कोण याचा फैसला 24 जानेवारीलाही होऊ न शकल्यानं आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र, उपराज्यपालांनी जाहीर केल्यानंतर आपने याचिका परत घेतली होती. दिल्ली आपच्या महापौरपदाच्या उमेदवार डॉ. शैली ओबेरॉय यांनी दिल्ली महापौरपदाची निवडणूक व्हावी यासाठी ही याचिका दाखल केली होती.

महापौरपदाच्या निवडणूकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिल्लीच्या उपराज्यपालांनी सत्या शर्मा यांची पीठासीन अधिकारी म्हणून निवड केली आहे. ६ जानेवारीला सुरुवातीला सर्व नगरसेवकांना शपथ दिली जाणार होती. मात्र, पिठासीन अधिकारी सत्या शर्मा यांनी उपराज्यपाल नियुक्त 10 स्वीकृत नगरसेवकांना शपथ देण्याचा निर्णय घेतला. याला आप (AAP) ने विरोध करत अगोदर जनतेतून निवडून आलेल्या नगरसेवकांना शपथ देण्याची मागणी केली. आणि सभागृहात मोठा गदारोळ झाला.

आपने शैली ओबेरॉय यांना महापौर पदाची उमेदवारी दिली आहे तर उपमहापौर पदाची उमेदवारी मोहम्मद इकबाल यांना दिली आहे. भाजप(Bjp)ने रेखा गुप्ता यांना महापौरपदाचं उमेदवार घोषित केलं आहे. रेखा गुप्ता या तिसऱ्यांदा महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.

आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये ६ जानेवारीला दिल्ली महानगरपालिकेच्या सभागृहात मोठा गोंधळ झाल्याने महापौरपदाची निवडणूक झाली नव्हती. 24 जानेवारीलाही गोंधळामुळं निवडणूक झाली नव्हती. दिल्ली महानगरपालिका निवडणूकीत आपने 15 वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपचा पराभव केला होता. आपला निवडणूकीत 134 तर भाजपला 104 जागा आणि कॉंग्रेसला 9 जागा मिळाल्या होत्या.

भाजपकडे प्रथमदर्शनी संख्याबळ नसताना महापौर आणि उपमहापौर पदाचा उमेदवार दिल्याने निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. भाजप ऐन वेळी काही करू शकते. या भीतीने आप बहुमत असूनही जपून पावलं टाकत आहे. 6 सदस्य असलेल्या स्थायी समितीच्या निवडणूकीत भाजपचे २ सदस्य सहज निवडून येतील. मात्र, भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने भाजप काही चमत्कार घडून आणेल का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

आपने स्वीकृत सदस्यांना भाजपचे कार्यकर्ते आहेत. असाही आरोप केला आहे. महापौर निवडणूकीत 274 सदस्य करणार मतदान दिल्ली महापौर निवडणूकीत 250 लोकनिर्वाचित सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. 7 लोकसभा खासदार, 3 राज्यसभा खासदार यांना मतदानाचा अधिकार आहे. तसंच उपराज्यपालांनी नामनिर्देशीत केलेल्या 14 आमदारांनादेखील मतदानाचा अधिकार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT