Delhi Mayor Election
Delhi Mayor Election Sarkarnama
देश

Delhi Mayor Election : चंदीगढनंतर आता दिल्लीच्या महापौर निवडणुकीत वादाची ठिणगी

Rajanand More

New Delhi News : चंदीगढ महापालिका निवडणुकीत काही महिन्यांपूर्वी मोठे राजकीय नाट्य घडले होते. पीठासीन अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांची मतं अवैध ठरवल्याने भाजपचा उमेदवार विजयी झाला होता. त्यानंतर हे प्रकरणी सुप्रीम कोर्टात गेलं. अखेर कोर्टातच मतमोजणी होऊन आपच्या उमेदवाराला घोषित करण्यात आले होते. त्यानंतर आता दिल्लीच्या महापौर निवडणुकीदरम्यानही (Delhi Mayor Election) वाद होण्याची चिन्हं आहेत.

दिल्ली महापालिकेचे महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडणार आहे. याअनुषंगाने दिल्लीतील मंत्री सौरभ भारद्वाज (Saurabh Bharadwaj) यांनी गंभीर आरोप केले आहेत. उद्या महापौर निवडणूक आहे, पण अजूनही पीठासीन अधिकाऱ्यांच्या नावाची फाइल सरकारकडे आलेली नाही, असे भारद्वाज म्हणाले. (Latest Political News)

नायब राज्यपाल केरळमध्ये आहेत. आतापर्यंतच्या परंपरेनुसार पद सोडणारे महापौर पीठासीन अधिकारी असणे आवश्यक आहे. पण नायब राज्यपाल ही परंपरा तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आधी माझ्याकडे फाइल यायला हवी होती. त्यानंतर मुख्यमंत्री आणि नंतर नायब राज्यपाल, पण माझ्याकडेच फाइल आली नाही. पीठासीन अधिकाऱ्यांची फाइल थेट नायब राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याचा दावा भारद्वाज यांनी केला आहे. (AAP News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक उद्या होणार की नाही, हेही स्पष्ट होत नाही. कारण अजूनही पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती नाही. त्यांच्याशिवाय ही निवडणूक होऊ शकत नाही, असे भारद्वाज म्हणाले. दरम्यान, बुधवारी सायंकाळी निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी एनओसी दिली आहे. त्यानुसार उद्याच निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट होते. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने एनओसी आवश्यक होती.

दरम्यान, आपने महापौरपदासाठी महेश खिच्ची यांना तर उपमहापौरपदासाठी रविंदर भारद्वाज यांना उमेदवारी दिली आहे. आपच्या दोन नगरसेवकांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पण त्यांनी अर्ज मागे घेत पक्षाला दिलासा दिला. मात्र, या बंडखोरीमुळे आपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. त्यानंतर दिल्लीत ही पहिलीच निवडणूक होत आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT