Reservation News : ‘आरएसएस’ची शंभरी, ‘या’ वर्षी भाजप आरक्षण संपवणार! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही नेत्यांच्या विधानांवरून वादही निर्माण झाला आहे. त्यातच रेवंध रेड्डी यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य करत पुन्हा वाद ओढवून घेतला आहे.
PM Narendra Modi, Revanth Reddy
PM Narendra Modi, Revanth ReddySarkarnama

Telangana News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या आरक्षण (Reservation News) आणि संविधान या मुद्द्यांवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने ओबीसीतून मुस्लिमांना आरक्षण दिल्याची टीका मोदींनी केली आहे. तर संविधान बदलण्यासाठी भाजपला 400 हून अधिक जागा हव्या असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. त्यानंतर आता तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा राग आळवला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी आरक्षणावरून भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 2025 मध्ये ‘आरएसएस’ला (RSS) शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे यावर्षी  ते एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण बंद करतील. आरएसएस आणि भाजप नेत्यांनी अनेकदा आरक्षणाबाबत  विधानं केली आहेत.

PM Narendra Modi, Revanth Reddy
Lok Sabha Election 2024 : मोदी, राहुल गांधींच्या भाषणांवर निवडणूक आयोग नाराज; भाजप, काँग्रेसला बजावली नोटीस...

मागावर्गीयांना आरक्षण देण्याबाबतचा मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला भाजपने विरोध केला होता, असे सांगत रेड्डी म्हणाले, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) 400 हून अधिक जागा मिळून एससी, एसटी आणि मागासवर्गीय घटकांचा कोटा रद्द करण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कारी पक्ष त्यांना मदत करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही (PM Narendra Modi) नुकतीच रेवंथ रेड्डी यांच्यावरही टीका केली होती. पंतप्रधान म्हणाले होते की, काँग्रेसला (Congress) एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण ओरबाडून घेत ते त्यांच्या विशेष व्होट बँकेला द्यायचे आहे. कर्नाटकात काँग्रेसने ओबीसीतून मुस्लिमांना आरक्षण दिले आहे. काँग्रेसची ही नीती देशातील ओबीसींसाठी (OBC Reservation धोक्याची घंटा आहे.

आरक्षण हे धर्माच्या आधारवर दिले जाऊ शकत नाही, असे संविधानकर्त्यांनी स्पष्ट केल्याचे मोदी म्हणाले होते. तेलंगणातही काँग्रेसचे मुख्यमंत्री मुस्लिमांना आरक्षण देतील, असा दावा मोदींनी भाषणादरम्यान केला होता.

दरम्यान, कर्नाटकमधील आरक्षणाबाबत मोदींनी काँग्रेसवर टीका केली असली तरी प्रत्यक्षात ओबीसीतून मुस्लिमांना आरक्षणाचा निर्णय 1995 मध्ये तत्कालीन देवेगौडा सरकारने घेतला होता. विशेष म्हणजे देवेगौडा यांचा जनता दल (धर्मनिरपेक्ष) सध्या एनडीएमध्ये आहे.     

PM Narendra Modi, Revanth Reddy
Lok Sabha Election 2024 : उद्या मतदान अन् आपल्याच उमेदवाराविरोधात मतं मागण्याची काँग्रेसवर वेळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com