देश

IAS in Bihar : धडाकेबाज मराठमोळ्या IAS अधिकाऱ्याला बिहारमध्ये विरोधकांनी घेरलं; सरकार ठामपणे बाजूने उभे...

Bihar IAS controversy : चार्टर्ड किंग एअर फाल्कॉन २००० या विमानाने ५ जून २०२५ रोजी दिल्ली ते पटना असे उड्डाण केले होते. हे विमान विमानतळावर न उतरविता एका फ्लाईंग संस्थेत उतरविण्यात आल्याने प्रश्न उपस्थित झाला आहे.

Rajanand More

IAS officer private jet row : कोणत्या मुद्द्यावरून राजकारण तापले, हे सांगता येत नाही. मुळचे नाशिकमधील IAS निलेश देवरे यांच्या चार्टर्ड विमान प्रवासावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. देवरे यांनी कुटुंबासह केलेल्या विमान प्रवासावरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. तर सत्ताधाऱ्यांनी देवरे यांच्या जातीचा मुद्दा काढत विरोधकांवर पलटवार केला आहे.

आयएएस देवरे हे २०११ चे बिहार केडरचे अधिकारी आहे. ते सध्या बिहारमधील पर्यटन विभागाचे सचिव आणि नागरी उड्डाण विभागाचे विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत. राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलासह काँग्रेसने त्यांच्या चार्डर्ट विमान प्रवासावरून नितीश कुमार सरकारवर निशाणा साधला आहे.

आरजेडी आणि काँग्रेसने देवरे यांना चार्टर्ड विमान प्रवास कसा परवडतो, त्यांचा खर्च कुणी केला, असे प्रश्न उपस्थित केला आहे. मागील वर्षी जून महिन्यात देवरे यांनी दिल्ली त पटना असा प्रवास केला होता. यावरून सोमवारी आरजेडीचे आमदार राहुल शर्मा यांनी विधीमंडळात मुद्दा काढला.

शर्मा यांनी म्हटले की, चार्टर्ड किंग एअर फाल्कॉन २००० या विमानाने ५ जून २०२५ रोजी दिल्ली ते पटना असे उड्डाण केले होते. हे विमान विमानतळावर न उतरविता एका फ्लाईंग संस्थेत उतरविण्यात आल्याने प्रश्न उपस्थित झाला आहे. बिहार सरकारमधील अधिकारी कुटुंबासह या विमानात होते. याची परवानगी घेतली होती की नाही? सरकार अशी सुविधा देते, असे मला वाटत नाही. इतर कुणी त्यासाठी पैसे दिले असतील, ते का? बदल्यात त्यांना काय मिळाले?, असे सवाल शर्मा यांनी केले आहेत.

शर्मा यांच्या या प्रश्नांना मंत्री अशोक चौधरी यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री नितीश कुमार, निलेश देवरे आणि मी जुलै महिन्यात अधिकृत दिल्ली दौऱ्यावर गेलो होतो. ते चार्टर्ड विमान परत रिकामे पाटणाला येणार होते. देवरे आणि त्यांचे कुटुंब या परतीच्या प्रवासात याच विमानाने आले. देवरे हे दलित असल्याने त्यांना विमानाने प्रवास करण्याचा अधिकार नाही का, असा पलटवार मंत्र्यांनी केला. मंत्र्यांनी जातीचा मुद्दा काढताच काँग्रेसने हा जातीचा मुद्दा नसून पारदर्शकतेचा मुद्दा असल्याचे प्रत्युत्तर दिले.

कोण आहेत IAS देवरे?

निलेश देवरे हे मुळचे नाशिकचे असून २०११ तुकडीचे बिहार केडरचे अधिकारी आहेत. मधुबनी आणि छपरा या जिल्ह्यांचे ते जिल्हाधिकारी होते. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी २०२२ मध्ये काम केले आहे. त्यावेळी ते पश्चिम चंपारणचे जिल्हाधिकारी होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT