CM oath row : CM पदाच्या शपथेसाठी तारीख ठरली, पण अमेरिकेतून फोन आला अन्..! राहुल गांधींबाबत मोठा गौप्यस्फोट

Himanta Biswa Sarma claim, Rahul Gandhi controversy : तरूण गोगोई यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रिपदासाठी सरमा यांच्या नावाला अनेक आमदारांचा पाठिंबा होता, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. २०११ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

BJP vs Congress row : विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना भाजप आणि काँग्रेसमध्ये दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहे. राज्यात सध्या भाजप सत्ता असून काँग्रेसने पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी ताकद लावली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांच्याकडून थेट मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप करत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर सरमा यांच्याकडून गोगोईंसह आता राहुल गांधींवरही निशाणा साधला जात आहे.

मुख्यमंत्री सरमा यांनी मीडियाशी बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढविला. सरमा हे २०१४ पर्यंत काँग्रेसमध्ये होते. पण मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी त्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पाच वर्षांपूर्वी ते आसामचे मुख्यमंत्री बनले. आता त्यांनी काँग्रेसने आपल्याला मुख्यमंत्रिपद का दिले नाही, याबाबत गौप्यस्फोट केला आहे.

सरमा यांनी सांगितले की, काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्याला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी तारीख निश्चित करण्यास सांगितले होते. त्यावेळी आपल्याला पक्षाच्या ५८ आमदारांचा पाठिंबा होता. पण अमेरिकेत असलेल्या राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांना फोन केला आणि संपूर्ण चित्रच बदलले.

Rahul Gandhi
Rajya Sabha Election: महाराष्ट्रातील ७ जागांसह देशभरातील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक जाहीर; 'हे' फायर ब्रँड खासदार पुन्हा येणार का?

तरूण गोगोई यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रिपदासाठी सरमा यांच्या नावाला अनेक आमदारांचा पाठिंबा होता, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. २०११ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते. पुढील निवडणुकीआधी २०१५ मध्ये सरमा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली अन् भाजपमध्ये प्रवेश केला होता. आसाममधील भाजपच्या पहिल्या विजयात त्यांचा मोठा वाटा राहिला होता.

सोनिया गांधी यांनी शपथ घेण्यासाठी तारीख ठरविण्यास सांगितल्यानंतर आपण त्यांना जून २०१४ मधील कामाख्या मंदिरातील अम्बुबाची मेळा संपल्यानंतर शपथ घेऊ असे सांगितले होते. त्यानंतर राहुल गांधींच्या फोनने स्थिती बदलली. त्यावेळी मी खूप दु:खी झालो होता. पण त्यावेळी जे घडले, ते चांगल्यासाठी असे आता वाटते. मी काँग्रेसध्ये राहून जे मिळविले असते, त्यापेक्षा अधिक मला देवाने आता दिल्याचे सरमा यांनी सांगितले.

Rahul Gandhi
Rahul Gandhi net worth : राहुल गांधींकडे नेमकी संपत्ती किती ? फक्त एका वर्षाचा आकडापाहून तुम्हीही व्हाल थक्क!

भाजपचा मुख्यमंत्री म्हणून मला आसामसोबतच सनातन धर्माची मनोभावे सेवा करण्याचीही संधी मिळाली आहे. काँग्रेसमध्ये असतो तर हे शक्य झआले नसते. पुढे कधी पुस्तक लिहिले ते या गोष्टींवर सविस्तरपणे प्रकाश टाकू, असेही सरमा यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, सरमा यांनी यापूर्वीही राहुल गांधींवर जोरदार टीका केली होती.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com