Bomb found at delhi
Bomb found at delhi  ANI
देश

थरारक! दिल्लीत घातपाताचा मोठा कट उधळला; बॉम्ब शेतात नेवून केला निकामी

सरकारनामा ब्युरो

दिल्ली : देशभरात ५ राज्यांतील निवडणूक आणि प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्लीत बॉम्बस्फोटाचा मोठा कट उधळून लावण्यात आला आहे. शहरातील गाझीपूर (IED recovery at Ghazipur Flower Market) परिसरातील फ्लॉवर मार्केटमध्ये बेवारस बॅगमध्ये स्फोटके आणि आयईडी पेरण्यात आले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दरम्यान गाझीपूर भाजी मंडईजवळील एका रिकाम्या शेतात खड्डा खोदून ही स्फोटके निकामी करण्यात आली आहेत.

याबाबत दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १०:५० मिनीटांच्या सुमारास एका पीसीआर कॉलवर गाझीपूर फूल मंडीजवळ एक बेवारस बॅग असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम आणि स्थानिक पोलिसांसह बॉम्बशोधक पथक (Bomb Squad Team) एनएसजीची (NSG Team) टीमही घटनास्थळी जाखल झाली होती. तपासादरम्यान या बॅगेमध्ये स्फोटक आणि तब्बल ३ किलो पर्यंत आयईडी (IED recovery at Ghazipur Flower Market) पेरण्यात आले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी एक्सप्लोजिव्ह कायद्याअंतर्गत दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेनंतर संपूर्ण परिसराची तपासणी केली जात आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा बॉम्ब (IED recovery at Ghazipur Flower Market) सापडल्याने खळबळ उडाली आहे. तसेच एक मोठा कट पोलिसांनी उत्तरप्रदेश आणि दिल्लीत उधळून लावला आहे.

पंजाबमध्ये सापडले मोठ्या प्रमाणात RDX

दिल्ली पाठोपाठ पंजाबमधील अमृतसरमध्येही ४-५ किलो आरडीएक्स पोलिसांनी जप्त केले आहे. यानंतर स्पेशल टास्क फोर्सने परिसरात शोध मोहिम सुरू केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राज्यातील गुरुदासपूरमध्येही आरडीएक्स जप्त करण्यात आले होते. त्याचवेळी, डिसेंबरमध्येच लुधियाना येथील न्यायालय संकुलात स्फोट झाल्याची घटना घडली होती. पंजाबमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याआधी मोठ्या प्रमाणात आरडीएक्स सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT