Delhi Pollution Sarkarnama
देश

Delhi Pollution : प्रदुषणामुळे राजधानी बेहाल; मुख्यमंत्र्यांनी सरकारी कार्यालयांबाबत घेतला मोठा निर्णय

Government Offices Timing CM Atishi Air Pollution : दिल्लीतील प्रदुषणाचा विळखा कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे.

Rajanand More

New Delhi News : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला प्रदुषणाचा विळखा पडला असून तो शहराभोवती अधिकच आवळत चालला आहे. त्यावर दिल्ली सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याचा परिणाम होताना दिसत नाही. आता सरकारने राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री आतिशी यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलल्यामुळे रस्त्यांवर होणारी वाहतुककोंडी कमी होऊन प्रदुषणही काही प्रमाणात नियंत्रणात येईल, असा दावा त्यांनी केला आहे. आतिशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता दिल्ली महापालिकेचे काम सकाळी 8.30 ते सायंकाळी 5 यावेळेत सुरू राहील. तर केंद्र सरकारची कार्यालये सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या वेळेत सुरू राहतील.

राज्य सरकारी कार्यालयांची वेळ सकाळी 10 ते सांयकाळी 6.30 अशी असेल. या वेळांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांची एकावेळी रस्त्यावर येणारी वाहने कमी होतील, असे सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान, दिल्लीतील प्रदुषणाने अतिघातक पातळी गाठली आहे. मागील तीन दिवसांपासून प्रदुषणाची ही पातळी कायम असल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे.

प्रदुषण रोखण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणीही शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आंतरराज्य बस सेवेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक बस वगळता सीएनजी व डिझेलवरील बसेसना दिल्लीत येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. खोदकाम, बांधकामांवरही बंदी घालण्यात आली आहे.

शाळांचे ऑनलाईन वर्ग

प्रदुषणामुळे सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. त्यामुळे दिल्लीती शाळांमध्ये इयत्ती पाचवीपर्यंतच्या शाळा ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत. सहावीपुढील वर्गातील विद्यार्थ्यांनाच शाळेत जावे लागेल. यापूर्वी प्रदुषणामुळे शाळांचे वर्ग ऑनलाईन घेतले जात होते. याव्यतिरिक्त महापालिकेकडून मोठ्या रस्त्यांवर दररोज पाण्याचे फवारे मारण्यात येणार आहेत.

हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने दिल्लीत हे निर्बंध लागू केले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील ग्रेडेड रिस्पॉन्स अक्शन प्लॅन म्हणजेच GRAP 3 ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिल्लीतील प्रदुषणावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यावर दिल्लीसह पंजाब आणि हरियाणातील सरकारवरही ताशेरे ओढले होते. प्रामुख्याने पंजाबमध्ये पराली (शेतातील पालापाचोळा) जाळली जात असल्याने दिल्लीत प्रदुषण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT