Sharad Pawar On Delhi Red Fort Blast Sarkarnama
देश

Delhi Red Fort Blast : दिल्लीतील स्फोटानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; पंतप्रधान अन् गृहमंत्र्यांचा उल्लेख करत म्हणाले, 'अत्यंत चिंताजनक...'

Sharad Pawar On Delhi Red Fort Blast : दिल्लीत सोमवारी संध्याकाळी (ता.10) संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी घटना घडली. ती म्हणजे लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 च्या बाहेर एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Jagdish Patil

Delhi Red Fort Blast : दिल्लीत सोमवारी संध्याकाळी (ता.10) संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी घटना घडली. ती म्हणजे लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 च्या बाहेर एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या स्फोटानंतर अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केली आहे. तपासात हा आत्मघाती हल्ला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर बॉम्बस्फोटात पुलवामा येथील रहिवासी उमर मोहम्मद याचे नाव समोर आले असून उमर मोहम्मद गाडी चालवत असल्याचा संशय आहे. तो उमर हा जैश-ए-मोहम्मद मॉड्यूलशी संबंधित असल्याचंही सांगितलं जात आहे.

या ब्लास्टनंतर देशभरातली विविध शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर या घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली. दिल्लीतील स्फोटाच्या घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करत आहे, असं मोदींनी म्हटलं आहे.

शिवाय या सर्व परिस्थितीचा आढावा घेत असल्याचंही मोदींनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे. दरम्यान, जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील या घटनेवर एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हणत या घटनेची सखोल चौकशी करण्याची विनंती पंतप्रधान व गृहमंत्र्यांना केली आहे.

शरद पवारांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं की, 'आज दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नल परिसरात एका कारमध्ये झालेल्या स्फोटात झालेली जीवितहानी अतीव दुःखद आहे. मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो व ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करतो. तसंच, जखमी नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो.

लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील परिसरात घडलेली ही दुर्दैवी घटना फार चिंताजनक आहे. माझी देशाचे पंतप्रधान व गृहमंत्र्यांना विनंती आहे की, सदर घटनेबाबत सखोल चौकशी करावी. त्यायोगे येणारा चौकशी अहवाल देशासमोर ठेवून अशा दुर्घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावलं उचलतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT