Delhi Red Fort Blast: दिल्लीला हादरवणारा भीषण कार स्फोट; जखमी अन् मृत्यू झालेल्यांची यादी आली समोर

Delhi Explosion: दिल्ली स्फोटानंतर पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून सर्वत्र झाडाझडती सुरू आहे. त्याचवेळी स्फोट घडल्यानंतर दोन तासांच्या आत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे या तपासाला आता गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्ली स्फोटानंतर यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Red Fort blast
Red Fort blast Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात सोमवारी(ता.10) झालेल्या भीषण कार स्फोटानं संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी घटनास्थळी जात परिस्थितीचा आढावा घेतला असून जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आहे. आता दिल्लीतील कार स्फोटात (Delhi Car Blast) जखमी आणि मृत्यू झालेल्यांची यादी समोर आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील स्फोटाची गंभीर दखल घेतली आहे. कारमध्ये झालेल्या या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता असून 30 हून अधिक लोक यात गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दिल्ली स्फोटानंतर पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून सर्वत्र झाडाझडती सुरू आहे. त्याचवेळी स्फोट घडल्यानंतर दोन तासांच्या आत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे या तपासाला आता गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्ली स्फोटानंतर यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) संध्याकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशन सिग्नलजवळ हा स्फोट झाला. यावेळी तिथे असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ,हा स्फोट इतका भीषण होता की, आजपर्यंत कधीच असा स्फोट पाहिला नसल्याचं म्हटलं जातं.

Red Fort blast
Amit Shah On Delhi Blast: दिल्ली पुन्हा टार्गेट..? गृहमंत्री अमित शाह यांची कार स्फोटानंतर पहिली मोठी रिअ‍ॅक्शन समोर, म्हणाले...

एकापाठोपाठ दोनदा मोठ्या स्फोटाचा आवाज झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटामुळे मोठी आग लागली आणि या त्यात काही गाड्या जळून खाक झाल्या. अमित शाह यांच्या रुग्णालयातील भेटीनंतर आता जखमी आणि मृत्यू झालेल्यांची यादी समोर आली आहे.

Red Fort blast
Jayant Patil On BJP: जयंत पाटलांनी भाजपवर पहिला डाव टाकला, 40 वर्षांपासून एकनिष्ठ असणारा गडी हेरला

दिल्लीत स्फोटाची मोठी घटना घडली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. टे ट्विटमध्ये म्हणतात, "दिल्लीत आज संध्याकाळी झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. या घटनेतील जखमींना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शहा आणि इतर अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला", असंही ट्विटमध्ये मोदींनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com