Delhi Schools Bomb Threat Sarkarnama
देश

Delhi Schools on Alert : दिल्लीतील 50 हून अधिक शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; शाळा केल्या रिकाम्या

Rajanand More

New Delhi News : दिल्ली आणि नोएडातील जवळपास 50 हून अधिक शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी (Delhi Schools on Alert) देण्यात आली आहे. सर्व शाळांना एकाचवेळी ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर शाळांनी हा माहिती पोलिसांना दिल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे पालकांची चांगलीच धावपळ उडाली. सध्या दिल्ली पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकांकडून शाळांची तपासणी केली जात असून आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा बॉम्बसदृश वस्तू आढळून आलेली नाही.

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार, द्वारका आणि वसंतकुंज येथील दिल्ली पब्लिक स्कूल, मयूर विहार येथील मदर मेरी स्कूल, पुष्प विहार येथील संस्कृती आणि अमिटी स्कूल, दक्षिण-पश्चिम दिल्लीतील डीएव्ही स्कूल, नोएडातील दिल्ली पब्लिक स्कूलसह जवळपास 50 हून अधिक शाळांना धमकी ई-मेल आले आहेत. (Bomb Threat)

शाळांकडून ही माहिती तातडीने दिल्ली पोलिसांना देण्यात आली. बहुतेक शाळा सुरू असल्याने शाळांमध्ये विद्यार्थीही होते. त्यामुळे पालकांना कळवून तातडीने विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकांसह अग्निशमन यंत्रणाही संबंधित शाळांमध्ये दाखल झाली असून शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे. (Latest Marathi News)

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डीपीएस शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, ‘शाळेला धमकीचा मेल आला असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षेबाबत धमकावण्यात आले हे. त्यामुळे आम्ही तातडीने विद्यार्थ्यां घरी पाठविले.’ दरम्यान, प्राथमिक तपासामध्ये संबंधित ई-मेल भारताबाहेरून आल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी काही शाळांना बॉम्बची धमकी आली आहे. विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले असून दिल्ली पोलिसांकडून शोध मोहिम सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही शाळेमध्ये संशयास्पद काही आढळून आलेले नाही. आम्ही पोलिस आणि शाळांच्या संपर्कात आहोत. पालक आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही आतिशी यांनी केले आहे.     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT