Lok Sabha Election 2024 : 'विद्यमान खासदार पडणार', माजी मंत्र्यांनी तब्बल 9 लाखांची लावली पैज...

Buldhana News : यासाठी 3.15 लाख रुपयांची ही पैज असून पैज जिंकल्यास पैज लावणाऱ्यास तब्बल 9.45 लाख रुपये मिळणार आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Sarkarnama
Published on
Updated on

Buldhana News : लोकसभा निवडणुकीत दोन टप्पे पार पडले आहे. राज्यात एकूण ५ टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या बुलढाणा निवडणुकीची सध्या चर्चा आहे. क्षणा-क्षणाला बदलणारे राजकारण, उमेदवारांकडून एकमेकांना मिळणाऱ्या धमक्या चर्चेत आहेत. आता निकालाकडे जितकं राजकीय पक्षांचं, नेत्यांचं लक्ष लागलेलं असतं, तितकंच लक्ष असतं कार्यकर्त्यांचंही असंत. त्यामुळे ‘तुमच्यासाठी कायपण’ असं म्हणणारे कार्यकर्ते काय करतील याचा नेम नाही. नुकतंच झालेल्या निवडणुकीच्या निमित्ताने असाच किस्सा समोर आला आहे. किस्सा आहे बुलढाणा जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यांच्या पैजेचा... (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील निकालात महायुतीचे उम्मेदवार खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव होणार यावर ही पैज लावण्यात आली आहे. यासाठी 3.15 लाख रुपयांची ही पैज असून पैज जिंकल्यास पैज लावणाऱ्यास तब्बल 9.45 लाख रुपये मिळणार आहे. पैज लावणारा चक्कं राज्याचा माजी मंत्री आहे. राज्याचे माजी महसूलमंत्री तथा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री सुबोध सावजी यांनी ही पैज लावली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Narendra Modi Satara : देशात लवकरच मोठं कांड होणार? PM मोदी नेमके काय म्हणाले?

काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री सुबोध सावजी हे नेहमीच आपल्या अफलातून आंदोलन, थेट मारधाडीच्या धमक्या आणि जनतेच्या हितासाठी वाट्टेल ते करण्यासाठी जिल्ह्यात सावजींचे नाव घेतल्या जाते. यापूर्वी भाजपचे आमदार राम कदम यांच्या 'महिलांचे अपहरण' या वक्तव्यावरून कदम यांची जीभ तोडणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी ही दिली होती. 'भिडे गुरुजींना अटक करा,' अन्यथा मी त्यांचा मर्डर करेल”, अशी ती धमकी होती. त्यांनतर निर्ढावलेली यंत्रणा जागी होत नाही. हे पाहून सावजी यांनी थेट जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांचा खून करण्याची धमकी दिली होती. याशिवाय विहिरी आंदोलन करणे, बक्षिसे जाहीर करणे हे त्यांचे काम.

Lok Sabha Election 2024
Subodh Saoji On Sambhaji Bhide: '...अन्यथा माझ्या हातून संभाजी भिडेंचा मर्डर होईल'; माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या व्हिडिओने खळबळ

मात्र आता ते पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे. बुलढाणा लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव निश्चित असल्याचा दावा आणि आत्मविश्वास असल्याने त्यांनी मुंबईच्या एका मित्रासोबत लाखोंची पैज लावली आहे. विशेष म्हणजे ही पैज लावल्यानंतर माजी मंत्री सुबोध सावजी यांनी ती माध्यमांवर जाहीर सुद्धा करून टाकली.

Lok Sabha Election 2024
Abhijeet Patil Way On the BJP : शरद पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का; विश्वासू नेते अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर?

बुलढाणा लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांचा पराभव होणार अशी ही पैज आहे. माजी मंत्री सावजी यांनी लावलेल्या पैजेप्रमाणे 9 लाख 45 हजार रुपये रोख मिळणार आहेत. आणि प्रतापराव जाधव हे निवडून आले तर सावजींना 3 लाख 15 हजार रुपये रोख आपल्या मित्राला लावलेल्या पैज नुसार द्यावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com