Chief Minister Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Delhi Service Bill: भाजपने पाठीत खंजीर खुपसला; 'दिल्ली सेवा बिल' लोकसभेत मंजूर होताच केजरीवालांनी डागली तोफ

Monsoon Session: 'दिल्ली सेवा बिल' लोकसभेत मंजूर झाल्याने केजरीवाल सरकारला मोठा झटका बसला.

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगच्या अधिकाराशी संबंधित असलेले 'दिल्ली सेवा बिल' लोकसभेत मंजूर झाल्याने केजरीवाल सरकारला मोठा झटका बसला. यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी आपली प्रतिक्रिया देत भाजपने जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हणत मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली.

'दिल्ली सेवा विधेयकामध्ये दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगच्या संबंधित अंतिम अधिकार उपराज्यपालांना देण्याची तरतूद आहे. याच विधेयकावरून केंद्र सरकार आणि केजरीवाल सरकारमध्ये वाद सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग आणि बदल्यांचे अधिकार हे दिल्ली सरकारचे असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी दिला होता. मात्र, यानंतर केंद्र सरकारने अध्यादेश जारी करत न्यायालयाचा हा निर्णय पलटवला.

आता केंद्र सरकारने लोकसभेत हे विधेयक मंजूर केले असून राज्यसभेत हे विधेयक मंजूर होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभेत दिल्ली सेवा विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर केजरीवालांनी भाजपवर निशाणा साधला.

"भाजपने दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. पण आज याच भाजपने दिल्लीतील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे यापुढे भाजपच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका", असे टिकास्त्र सोडले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT