Muralidhar Mohol News : मोहोळांकडे आता 'महाविजय २०२४' चे लोकसभा समन्वयकपद अन् 'हर घर तिरंगा'ची जबाबदारी

Muralidhar Mohol Big Eesponsibility : मोहोळ यांच्यावर नव्या संघटनात्मक जबाबदाऱ्या भाजपने सोपविल्या आहेत.
Muralidhar Mohol News
Muralidhar Mohol NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune BJP News : भाजपने प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्यावर नव्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. त्यामध्ये 'महाविजय २०२४' या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे पुणे लोकसभा समन्वयक'पद आणि 'हर घर तिरंगा अभियाना'ची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहोळ (Muralidhar Mohol) यांना या संबंधीचे पत्र दिले.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी (BJP) महत्वाकांक्षी अभियान असलेल्या 'महाविजय २०२४' साठी पुणे लोकसभा मतदारसंघाचे समन्वयकपद देत कोथरुड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी या सहा विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणूनही मोहोळ यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या संकल्पनेतूनेतील 'हर घर तिरंगा' या अभियानाचे प्रदेश संयोजक म्हणूनही ते काम पाहणार आहेत.

Muralidhar Mohol News
Nilesh Lanke News : आमदार लंके संतापले; मुख्यमंत्री शिंदेंनी भेट देऊनही अतिवृष्टीग्रस्तांना मदत नाहीच

मोहोळ म्हणाले, पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या आपण पूर्ण क्षमतेने, समर्पण भावनेतून पार पाडणार आहोत. संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनासोबत घेऊन 'महाविजय २०२४' ची जबाबदारी निश्चितपणे यशस्वी करण्याचा प्रयत्न करू. विश्वासाने या जबाबदाऱ्या सोपविल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे त्यांनी आभार मानले. पक्ष श्रेष्ठींचा विश्वास निश्चितपणे आपण सार्थ करून दाखवू, असा विश्वास व्यक्त केला.

Muralidhar Mohol News
PCMC Railway Station Bhumi Pujan: पिंपरीतील रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन रविवारी मोदींच्या हस्ते

स्वातंत्र्यदिनी केंद्र सरकारकडून 'हर घर तिरंगा' हे अभियान राबवण्यात येणार आहे. शासकीय पातळीबरोबर पक्षाच्या माध्यमातून हे अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न असणार आहे. गेल्या वर्षी या अभियानाला मिळालेला प्रतिसाद मोठा होता. यंदाही या अभियानाबाबत राज्यातील प्रत्येक घरावर तिरंगा दिसेल, यासाठी प्रयत्न असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com