Delimitation Bill in Parliament : केंद्रातील भाजप मोदी सरकारने डिलिमिटेशन विधेयकाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, बहुमतासाठी आकडेमोड सुरू आहे. लोकसभेची एकूण सदस्यसंख्या 543 आहे. या एकूण जागापैकी तीन जागा रिक्त आहेत. दोन खासदार तुरुंगात आहेत. एक खासदार निलंबित आहेत.
अशी सभागृहाची संख्या 538 वर आली आहे. डिलिमिटेशन एनडीए भाजप मोदी सरकारकडे अंदाजे 354 सदस्यांचा पाठिंबा आहे. असे असताना चार मतांची गरज आहे. त्यामुळे दिल्लीत सत्ताधारी नेमके कोणता गेम करून, बहुमत मिळवते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
डिलिमिटेशन विधेयकामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे. भाजप मोदी सरकार (Modi Government) कोणत्याही परिस्थितीत घटनादुरुस्ती करून, विधेयक मंजूर करून घेण्याच्या तयारी आहेत. लोकसभेची एकूण सदस्यसंख्या 543 आहे. त्यातील 3 जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे लोकसभेची सध्याची सदस्यसंख्या 540 आहे.
लोकसभेचे (Lok Sabha) दोन सदस्य अमृतपाल सिंह आणि रशीद इंजिनिअर हे तुरुंगात आहेत. राष्ट्रीय मुद्याच्या सुरक्षिततेवरून अपक्ष खासदार अमृतपाल सिंह हे तुरुंगात आहेत. ते खलिस्तानी समर्थक म्हणून देखील ओळखले जातात. अपक्ष खासदार रशीद इंजिनिअर हे दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपांवरून तुरुंगात आहेत. त्यांना सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याची परवानगी मिळाली नाही, तर सभागृहातील उपस्थित सदस्यसंख्या 538 होईल.
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. सध्या केवळ पावसाळी अधिवेशनच सुरू राहणार असल्याने त्यांचे निलंबन मागे घेतले नाही, तर सभागृहातील प्रत्यक्ष सदस्यसंख्या 537 होईल.
डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी 358 मतांची आवश्यकता आहे. सर्व 537 सदस्य मतदानात सहभागी झाले, तर सरकारला हे विधेयक मंजूर करण्यासाठी 358 मतांची आवश्यकता असेल. आतापर्यंत सरकारला 354 सदस्यांचा पाठिंबा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणजेच विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला आणखी 4 मतांची गरज आहे.
डीएमकेने आपली भूमिका आज स्पष्ट करत तामिळनाडूच्या हितासाठी डिलिमिटेशनच्याविरोधात भूमिका ठाम केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि वायएसआर काँग्रेस यांनी सरकारच्या बाजूने मतदान करणे आवश्यक असणार आहे.
डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यास, देशाच्या निवडणूक नकाशा बदलणार आहे. लोकसभेच्या जागांची संख्या 800 पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे, तर विधानसभेच्या जागांमध्येही 50 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. उत्तर प्रदेश विधानसभेतील जागांची संख्या 605 पर्यंत पोहोचू शकते. यापैकी एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव असतील. त्यामुळे मतदारसंघांची रचनाही बदलणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.