DMK MK Stalin : काँग्रेसशी काडीमोड, पण मोदी सरकारविरोधात डीएमके आक्रमक! डिलिमिटेशनवर स्टॅलिन यांचा भाजपला थेट इशारा

MK Stalin opposes any cut in Tamil Nadu 7.18% Lok Sabha share as DMK stands firm on delimitation demands ahead of Parliament special sitting : लोकसभेतील तमिळनाडूचा 7.18 टक्के प्रतिनिधित्वाचा वाटा कायम ठेवण्याची मागणी; 1971 च्या जनगणनेवर आधारित जागांचे प्रमाण आणखी 25 वर्षे गोठवण्यावर स्टॅलिन ठाम
DMK MK Stalin
DMK MK StalinSarkarnama
Published on: 
Updated on: 

Delimitation Bill 2026 : इंडिया आघाडीत काँग्रेसबरोबर झालेल्या मतभेदावरून, आक्रमक असलेल्या डीएमके, डिलिमिटेशन बिलावर विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे.

तमिळनाडूच्या लोकसभेतील प्रतिनिधित्वाचा वाटा कमी होऊ नये आणि 1971च्या जनगणनेवर आधारित जागांचे प्रमाण पुढील 25 वर्षांसाठी कायम राहावे, या प्रमुख मागणीवर डीएमकेचे प्रमुख एम. के. स्टॅलिन ठाम आहेत. यावर कोठेही तडजोड न करण्याची भूमिका घेत, इंडिया आघाडीबरोबर राहण्याचे संकेत दिले आहेत.

केंद्रातील भाजप (BJP) मोदी सरकारने, संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. लोकसभेचे कामकाज सोमवारी (ता. 30), तर राज्यसभेचे कामकाज (ता. 2) सुरू होणार आहे. तीन डिसेंबरपर्यंत दोन्ही सभागृहांचे कामकाज होणार अशून, सरकारी कामकाज पूर्ण करण्यासाठी हे अधिवेशन बोलावले जात असल्याचे सांगितले आहे. याच अधिवेशनात डिलिमिटेशन (लोकसभा मतदारसंघ फेररचना) घटनादुरुस्ती विधेयक मांडले जाण्याची शक्यता असल्याने सत्ताधारी भाजप लोकशाही विकास आघाडीविरुद्ध काँग्रेस इंडिया आघाडी सावध झाली आहे.

2026च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने (Congress) डीएमकेसोबतची दीर्घकाळची युती तोडून अभिनेता सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील 'तमिळगा वेत्री कषगम' (TVK) पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिला. सत्तेच्या पदांसाठी काँग्रेसने युतीच्या नीतिमत्तेचा भंग करून विश्वासघात केल्याचा आरोप डीएमकेने केला आहे.

डीएमकेने जून 2026मध्ये नवी दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. तसेच, 12 ऑक्टोबर 2026 रोजी डीएमकेने अधिकृतपणे स्पष्ट केले, की त्यांनी इंडिया आघाडी सोडली, असून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नाहीत, अशी भूमिका घेतली होती.

काँग्रेसशी काडीमोड?

डीएमके खासदारांनी लोकसभेतही काँग्रेस खासदारांपासून वेगळे बसण्याची भूमिका घेत, लोकसभेत 22 खासदार असलेला डीएमके पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीचा भाग नाही आणि त्यांनी स्वतंत्र राजकीय मार्ग निवडल्याचे, संकेत दिले होते. परंतु आता सत्ताधारी भाजप मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्याने, डिलिमिटिशेन घटनादुरुस्ती विधेयक मांडले जाणार असल्याच्या शक्यतेने डीएमके काय भूमिका घेणार, याकडे आता लक्ष लागले होते.

तामिळनाडूच्या हितासाठी ठाम

डिलिमिटेशनवरून सत्ताधारी भाजप मोदी सरकारने दिल्लीतील या राजकीय वातावरण तापले असतानाच, डीएमकेची आता भूमिका समोर आली आहे. डीएमकेचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी, लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवली, तरी कोणत्याही परिस्थितीत तामिळनाडूच्या लोकसभेतील वाटा सध्याच्या 7.18 टक्क्यांपेक्षा कमी होता कामा नये! 1971 च्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात आलेले आणि यापूर्वी गोठवण्यात आलेले राज्यांमधील लोकसभेतील प्रतिनिधित्वाचे विद्यमान प्रमाण आणखी 25 वर्षे कायम ठेवले पाहिजे! अशी भूमिका घेत, इंडिया आघाडीबरोबर या मुद्यावर कायम राहण्याचे ठरवल्याचे थेट संकेत दिले.

डळमळीत होणार नाही

डीएमके आजही या दोन्ही भूमिकांवर ठाम आहे आणि यापुढेही ठाम राहील, असे स्पष्ट करत माध्यमांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या अटकळबाजीने आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या कुरबुरींनी आमची भूमिका कोणत्याही प्रकारे डळमळीत होणार नाहीत. तामिळनाडूच्या हिताशी डीएमके कधीही तडजोड करणार नाही, असा इशारा एम. केये स्टॅलिन यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.