Nitish Kumar sarkarnama
देश

Bihar Politics : बिहारमध्ये भाजपने जास्त जागा जिंकल्या तरी नितीश कुमारच होणार मुख्यमंत्री! काय आहे फाॅर्म्युला?

Bihar Assemble Election BJP Nitish Kumar : बिहारमध्ये एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असाच सामना होण्याची शक्यता आहे. एनडीएमध्ये नितीशकुमार यांचा जेडीयू, भाजप आणि चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष असेल

Roshan More

Bihar Politics : महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. या तीनही राज्यात भाजपचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत देखील भाजप आपला मुख्यमंत्री करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती.

मात्र, केंद्रातील सरकार हे नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या पाठींब्याने बहुमतामध्ये आहे. ही बाब लक्ष्यात घेत बिहार विधानसभा निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढली जाणार आहे. त्यामुळे भाजपला जरी जेडीयूपेक्षा जास्त जागा मिळाल्या तरी नितीश कुमारच मुख्यमंत्रि‍पदाचा चेहार असतील, अशी चर्चा भाजपच्या अंतर्गत वर्तुळात सुरू आहे.

बिहारमध्ये एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असाच सामना होण्याची शक्यता आहे. एनडीएमध्ये नितीशकुमार यांचा जेडीयू, भाजप आणि चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष असेल तर इंडिया आघाडीमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली आरजेडी आणि काँग्रेस असे पक्ष असतील.

लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने आपली ताकद दाखवून दिली. दिल्लीमध्ये तर तब्बल 28 वर्षानंतर भाजपचा मुख्यमंत्री बनला. त्यामुळे बिहारमध्ये अनेक वर्षांपासून भाजपचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

केंद्रातील सरकारला नितीश कुमार यांचा असलेला पाठींबा तसेच मुख्यमंत्रि‍पदासाठी ते पुन्हा तेजस्वी यांच्याशी हातमिळवण्या धोका देखील ते पत्करू शकतात. त्यामुळे नितीश कुमार यांनाच बिहार निवडणुकीत मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा केला जाण्याची शक्यता आहे.

भाजपकडे नाही मोठा नेता

बिहार विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना भाजपकडे संघटनात्मक ताकद जास्त दिसत आहे. मात्र, नितीश कुमार यांच्यासारखा राज्यभर स्वीकारला जाऊ शकले असा चेहरा नाही. जातीचे समीकरण पाहता छोट्या ओबीसी जाती या नितीश कुमार यांच्यासोबत असल्याचे दिसते. त्यामुळे बिहारमध्ये एनडीए आघाडीकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्रि‍पदासाठी नितीश कुमार यांचेच नाव आघाडीवर राहणार असल्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT