
Mumbai News : महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त राज्यासह देशात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील अंजिक्य देवगिरी प्रतिष्ठानच्यावतीने आग्रा किल्ल्यात देखील जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष करून ‘अफझल खान वध’ प्रसंगाचे नाट्यरूपांतर यानिमित्ताने सादर होणार आहे. या कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचा, देशाचा अभिमान आहेत. त्यामुळे यंदाही बुधवारी (ता. 19) रोजी आग्रा येथील ऐतिहासिक किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने भव्य सोहळा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी ही माहिती दिली.
विनोद पाटील यांनी सांगितले, की 19 फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाची सुरवात शिवरायांवरील गीतगायनाने होईल. या ऐतिहासिक सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारे सिने अभिनेते विकी कौशल यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहील. याशिवाय महाराष्ट्रातील विविध मंत्री, खासदार, आमदार देखील कार्यक्रमात सहभागी होतील.
शिवजयंती कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित विशेष सादरीकरण, सुप्रसिद्ध गायक नितीन सरकटे आणि उत्कर्ष शिंदे यांचे राष्ट्रभावना जागवणारे गीतगायन, शिव जन्माचा पाळणा आणि ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतांचे दमदार सादरीकरण करणार आहेत.
याशिवाय ‘अफझल खान वध’ प्रसंगाचे नाट्यरूपांतर, पारंपरिक मर्दानी खेळांचे थरारक सादरीकरण होईल. शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित दीपोत्सव आणि डिजिटल आतषबाजी होईल. या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी जगभरातील शिवप्रेमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे थेट सहभागी होऊ शकतील, असेही विनोद पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.