BJP Denied Ticket to Utpal Parrikar.
BJP Denied Ticket to Utpal Parrikar.  Sarkarnama
देश

उत्पलला 'पणजीसाठी' शब्द दिला होता; देवेंद्र फडणविसांचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) आज मोठी घोषणा केली आहे. पणजीतून आपण अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आज याबाबत बैठक घेवून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. त्यांना भाजपने पणजी (Panaji) विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारले असल्याने ते पक्षावर नाराज होते. त्यांना यापुर्वी भाजपने अन्य दोन मतदारसंघांचा पर्याय दिला होता. पण त्यांनी हे दोन्ही पर्याय नाकारत पणजीतून अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. (Goa Election 2022)

गोव्याचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरूवारी उमेदवारी यादी जाहीर केली. त्यात पर्रीकरांना पणजीतून डावलण्यात आले आहे. (BJP Denied Ticket to Utpal Parrikar) पणजीतून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांनाच भाजपने तिकिट दिले आहे. त्यावर उत्पल (Utpal parrikar) यांनी आता भाजपविरोधात बंड करुन पणजीतूनच अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पणजी मतदारसंघात भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आता उत्पल अशी बहुरंगी लढत होणार आहे. (Utpal Parrikar news goa)

मात्र या सगळ्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपण उत्पलला 'पणजी'साठी शब्द दिला होता असा गौप्यस्फोट केला आहे. आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले, उत्पलला आम्ही दोन जागांचा पर्याय दिला होता. त्यातील एक जागा ही भाजपची पारंपारिक निवडून येणारी जागा आहे. पण त्यांनी जर पणजी पाहिजे असे हट्ट धरला तर ते योग्य होणार नाही. मनोहर पर्रीकर हे देखील संघटन शरण होते. संघटनेने एखादी गोष्ट सांगितली तर ते नाकारायचे नाहीत.

उत्पलकडून देखील हिच अपेक्षा आहे. पणजीबाबत आम्ही उत्पलला स्पष्ट सांगितले होते. ज्यावेळी भाजपला गोव्यात सरकार स्थिर करायचे होते, त्यावेळी बाबूश मोन्सेरात भाजपसोबत आले. त्यांना आपण त्यावेळी पणजीबाबत शब्द दिला होता. त्यामुळे तो पाळणे गरजेचे होते. अन्यथा भविष्यात पक्षावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे त्यांनी पक्षाची ही अडचण सध्या समजून घ्यावी. सध्या दुसऱ्या जागेवरुन निवडून यावे आणि ५ वर्षानंतर त्यांना पणजीला पुन्हा देवू. मी आजच त्यांना याबाबतचा शब्द दिला.

फडणवीस पुढे म्हणाले, शेवटी संघटनेत काम करत असताना मी म्हणतो तसचं करा असे होतं नसते. आडमुठी भूमिका घेवून चालत नाही. भाजपमध्ये तर नाहीच. ती उत्पलने देखील घेवू नये आणि ती घेणार नाहीत अशी अपेक्षा आहे. आम्ही त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत समजावू. कारण पर्रीकर परिवार हा आमचा परिवार आहे, असे म्हणत केवळ भाजपलाच पर्रीकर कुटुंबियांविषयी आस्था असून शिवसेना, आम आदमी हे केवळ उत्पलचा वापर करणारे पक्ष आहेत, असाही टोला फडणवीस यांनी यावेळी बोलताना लगवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT