अखेर पर्रीकरांचे भाजपविरोधात बंड : पणजीतून निवडणूक लढवण्याची घोषणा

Utpal Parrikar will contest independent from panaji : दोन्ही पर्याय नाकारत पणजीतून अपक्ष उभे राहण्याचा निर्णय
Utpal Parrikar and Atanasio Monserrate News Updates
Utpal Parrikar and Atanasio Monserrate News UpdatesSarkarnama

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) आज मोठी घोषणा केली आहे. पणजीतून ते अपक्ष लढणार आहेत. आज त्यांनी याबाबत बैठक घेवून आपला निर्णय जाहीर केला. त्यांना भाजपने पणजी विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारले असल्याने ते पक्षावर नाराज होते. त्यांना यापुर्वी भाजपने दोन मतदारसंघांचा पर्याच दिला होता. पण पर्रीकर यांनी हे दोन्ही पर्याय नाकारत पणजीतून अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. (Goa Election 2022)

गोव्याचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरूवारी उमेदवारी यादी जाहीर केली असून, त्यात पर्रीकरांना डावलण्यात आले आहे. (BJP Denied Ticket to Utpal Parrikar) पणजीतून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना भाजपने तिकिट दिले आहे. यामुळे उत्पल पर्रीकर यांना भाजपने डावलल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्रीकर यांनी पणजीतूनच तिकीट देण्याची मागणी केली होती. (Goa Political News)

Utpal Parrikar and Atanasio Monserrate News Updates
अखंडपणे 50 वर्षे प्रज्वलित असलेली 'अमर जवान ज्योत' आज विझणार; मोदी सरकारचा निर्णय

पर्रीकर यांच्याकडून उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत आपला निर्णय घोषित केला आहे. त्यांनी दुपारी पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर भाजपच्या गोटातही चर्चेला उधाण आलं होते. ते भाजपचा पर्याय स्वीकारणार की पणजी मतदारसंघातून अपक्ष लढत बंडखोरी करणार? याशिवाय भाजपला सोडचिठ्ठी देत इतर पक्षांकडून उमेदवारी मिळवणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Utpal Parrikar and Atanasio Monserrate News Updates
हरला तरी काळजी नको! उत्पल पर्रीकर यांच्यासाठी भाजपचा असा आहे खास 'प्लॅन'

दरम्यान, गोव्यातील अद्याप सहा जागांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यातील दोन जागांची ऑफर पर्रीकर यांना देण्यात आली होती. याबाबत वरिष्ठ पातळीवर उत्पल यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यातून निश्चितपणे मार्ग निघेल, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com