Devendra Fadnavis and Sharad Pawar Sarkarnama
देश

Devendra Fadnavis on Sharad Pawar Prediction : फडणवीस म्हणाले, "पवारांचे 'ते' स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही..

Sharad Pawars on 2024 election : हा ट्रेंड कायम राहिला तर या देशात वेगळं चित्र बघायला मिळेल.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील दंगली, आगामी निवडणुकांवर भाष्य केलं.

भाजपवर त्यांनी जोरदार हल्लाबोल करीत येत्या लोकसभा निवडणुकीबाबत भाकीत केलं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विधानाची खिल्ली उडवली. फडणवीस मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

कर्नाटकातील भाजपची परिस्थिती पाहता हळूहळू सर्वच राज्यातून भाजप पराभूत होत आहे. अशातच आता 2024 च्या लोकसभा निवडणुकांवरून शरद पवार यांनी भाष्य केले आहे. "राज्याच्या निवडणुकीत लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतलेली दिसते. त्यामुळे हा ट्रेंड कायम राहिला तर या देशात वेगळं चित्र बघायला मिळेल," अशी शक्यता शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

पवार म्हणाले, "राज्यांमधील निवडणुकीचा देशातील ट्रेंड हा भाजपविरोधी आहे. देशाचा नकाशा समोर ठेवला तर केरळमध्ये भाजप नाही. तामिळनाडूत नाही. कर्नाटकात नाही. तेलंगणात नाही. आंध्रात नाही. गोव्यात नव्हती, आमदार फोडून राज्य आणले. महाराष्ट्र बाजूला ठेवा. गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. हे मान्य करू. मध्यप्रदेशात आमदार फोडले राज्य आणले. यूपीत भाजपची सत्ता आहे. झारखंड, छत्तीसगड, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल या सर्व ठिकाणी भाजप नाही. भाजप फक्त गुजरात, यूपी आणि आसाममध्ये आहे,"

"राज्याच्या निवडणुकीत लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतलेली दिसते. हा ट्रेंड कायम राहिला तर या देशात वेगळं चित्र बघायला मिळेल. हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही, असे पवार म्हणाले. पवारांच्या या विधानावर फडणवीस यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर फडणवीस यांनी मिश्किलपणे उत्तर दिले.

फडणवीस म्हणाले, "लोकसभेच्या निवडणुका आल्या की शरद पवार अशी विधानं करीत असतात. गेल्या दोन निवडणुकीच्या वेळेसही त्यांनी अशाच प्रकारची विधान केली होती. पण त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही,"

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT