Kolhapur Hindu Morcha : कोल्हापूर पेटलं ; आंदोलक-पोलिसांमध्ये धक्काबुक्की ; शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन..

Kolhapur Clashes between protesters and police : सर्व हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
Kolhapur Hindu Morcha :
Kolhapur Hindu Morcha :Sarkarnama

Kolhapur Clashes between protesters and police : आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणामुळे कालपासून (मंगळवार)कोल्हापुरात तणावाचे वातावरण आहे. आज (बुधवारी) हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनसमोर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते जमले आहे.

हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला आहे. यावेळी आंदोलक आणि पोलिस यांच्यात शाब्दीक बाचाबाची अन् धक्काबुक्की झाली. त्यामुळे वातावरणात तणावपूर्ण आहे.आंदोलकांनी शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.

काल (मंगळवारी) कोल्हापूर शहरातील सात तरुणांच्या मोबाईलमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा स्टेटस ठेवण्यात आल्याचे आढळले आहे. यावरून कोल्हापूर शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कोल्हापूरच्या छत्रपती महाराज चौकात आज हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला आहे,

Kolhapur Hindu Morcha :
Shiv Sena Bhavan News : काय सांगता ! 'शिवसेना भवना'ला मोठं खिंडार ; पगारवाढ दिली नाही म्हणून चौघे कर्मचारी.. ; असं पहिल्यांदाच..

कोल्हापुरात बंदची देखील हाक देण्यात आली आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं जिल्ह्यात जिल्हाबंदीचे आदेश काढले आहेत.

अहमदनगरपाठोपाठ कोल्हापुरातही औरंगजेबाच्या फोटोवरून राडा झाला आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं ही वादाची ठिणगी पेटली.

Kolhapur Hindu Morcha :
kolhapur bandh News : कोल्हापूर प्रकरणात अधिक खोलात जावं लागेल ; फडणवीस म्हणाले, 'विरोधीपक्षातील नेत्याने ..'

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समाजघटकांना इशारा दिला. "असलं धार्मिक उदातीकरण खपवून घेणार नाही. कोल्हापूर प्रकरणात अधिक खोलात जावं लागलं," असे फडणवीस म्हणाले. कोल्हापुरात विरोधीपक्षातील एका नेत्याने काहीतरी घडणार असल्याचे सांगितले होते, त्यामुळे या प्रकरणाशी त्यांचा काही संबध आहे का, हे तपासण्यास येईल, असे फडणवीस म्हणाले.

सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे, येथील परिस्थितीत नियंत्रणाखाली आणा, असा आदेश सरकारने कोल्हापूर पोलिसांना दिला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com