Rajasthan Assembly Election 2023 News : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्यापूर्वीच (Rajasthan Assembly Election 2023)भाजपला मोठा झटका बसला आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षात इनकमिंग सुरु झाल्याने आनंदाने वातावरण आहे. आम आदमी पक्षाने डूंगरपुर आणि बांसवाडा येथून निवडणूक प्रचार अभियानास सुरवात केली आहे.
राजस्थानमध्ये आम आदमी पक्षाचे प्रभारी विनय मिश्रा यांच्या पुढाकाराने भाजपचे माजी आमदार देवेंद्र कटारा (Devendra Katara) यांनी 'आप'मध्ये प्रवेश केला आहे.
आम आदमी पक्षाचे प्रभारी विनय मिश्रा म्हणाले, "ही तर सुरवात आहे, लवकरत भाजप आणि काँग्रेसमधील अनेक माजी आमदार नेते, पदाधिकारी आपमध्ये प्रवेश करणार आहेत. राजस्थान विधानसभा मतदार संघाच्या सर्व जागा आम्ही लढविणार आहोत,"
राजस्थानमध्ये आता आम आदमी पार्टी सक्रिय झाली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राजस्थानमध्ये येणार आहेत.त्यासाठी राजस्थानमध्ये तयारी सुरु आहे, असे मिश्रा म्हणाले.
डूंगरपूर विधानसभेचे माजी आमदार कटार यांच्यासमवेत त्यांच्या मतदार संघातील अनेकांनी कटारा यांच्यासोबत देवेंद्र अहारी, अभिषेक मोडिया, जाबर सिंह खींचड, अमरदीप भगोरा, लक्ष्मण डोडियार आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.