Shiv Sena : प्रोफाईलवर धनुष्यबाण पण shivsena.in वरील माहिती गायब; Twitter हॅंडल हॅक?

Shinde vs Thackeray : सोशल मीडियावरही ठाकरे व शिंदे गटाचा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Shiv Sena Latest News
Shiv Sena Latest News Sarkarnama
Published on
Updated on

Shinde vs Thackeray : एकनाथ शिंदे गटाला शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह दिले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आमचीच शिवसेना खरी म्हणणाऱ्या शिंदे गटाला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळताच शिंदे गटाच्या नेत्यांकडून जोरदार जल्लोष केला जात आहे. अशात आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाच्या अनेक नेत्यांचे आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल पिक्चरवर धनुष्यबाण हे चिन्ह ठेवलं आहे. एकीकडे हे सुरु होत असताना दुसरीकडे शिवसेनेचे ट्विटर हॅंडल हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे.

शिंदे गटाला शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर ही माहिती गायब झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावरही ठाकरे व शिंदे गटाचा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेनेच्या महाराष्ट्र व मुंबई ट्विटर हॅंडल पेजवर असलेली shivsena.in या लिंकवरील माहिती गायब झाली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर माहिती उपलब्ध नसल्याचा मेसेज येतो. विविध पक्षाच्या ट्विटर हॅंडलवर त्यांच्या पक्षाची माहिती देणारी लिंक आहे.

Shiv Sena Latest News
Prakash Ambedkar : आंबेडकरांनी ठाकरेंना दिला सल्ला ; 'या' मुद्दावर न्याय मिळेल..

त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांची माहिती तत्काळ मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या महाराष्ट्र व मुंबई ट्विटर हॅंडल पेजवरील लिंक हॅक झाल्याची चर्चा सुरु आहे. ही माहिती नेमकी कोणी गायब केली. ही तांत्रिक अडचण आहे की कोणी हेतूपूरस्सर ही माहिती गायब केली आहे याची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राज्यात सहा महिन्यापासून सुरु झालेला ठाकरे व शिंदे गट संघर्ष अद्यापही सुरु आहे. सोशल मीडियावरही याचे पडसाद सुरुच आहे.शिवसेनेच्या महाराष्ट्र व मुंबई ट्विटर हॅंडलवरून shivsena.in लिंकची माहितीच गायब झाल्याने सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com