AMMK leader Dhinakaran addresses the media after alleging that a support letter issued in favour of Vijay was fake and filing a police complaint. sarkarnama
देश

Tamil Nadu Political : तमिळनाडूत सत्ता स्थापनेत नवा पेच, थलपती विजय यांना दिलेलं पाठींब्याचं पत्र खोटं, पक्षप्रमुख थेट राज्यपालांनाच भेटला

Fake AMMK Support Letter Vijay TVK : तमिळनाडूच्या राजकारात मोठा ट्विस्ट आला आहे. विजय यांच्या पक्षाने पाठींब्याचे सादर केलेले पत्र खोटे असल्याच आरोप एएमएमके पक्ष प्रमुख दिनाकरण यांनी केला आहे.

Roshan More

Vijay TVK News : तमिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. थलपती विजय यांना 118 ची मॅजिक फिगर गाठताना नवनवीन संकटांचा सामना करावा लागतो आहे. काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टीच्या मदतीने 116 आमदारांचा पाठींबा मिळालेल्या विजय यांना मोठा झटका बसला आहे. एएमएम के पार्टीच्या आमदाराच्या पाठींब्याचे पत्र विजय यांच्या टीव्हीकेने राज्यपालांना दिले होते. मात्र, हे पत्र खटे असल्याचा आरोप अम्मा मक्कल मुन्नेत्र कझगम(एएमएमके) प्रमुख टीटीवी दिनाकरन यांनी केला आहे.

दिनाकरन यांनी राज्यपालांची भेट घेत याविषयी तक्रार केली आणि पोलिसांमध्ये तक्रार करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या पक्षाकडून पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. एएमएमकेचा केवळ एकच आमदार विजयी झाला आहे.

दिनाकरन म्हणाले, आमच्या पक्षाचा केवळ एकच आमदार कामराज विजयी झाले आहेत. त्यांनी टिव्हीकेला समर्थन देणारे पत्र जारी केले होते.मला राज्यपालांना भेटण्याची वेळ मिळाली मी राज्यपालांना भेटलो आणि हे पत्र खोटं असल्याचे त्यांना सांगितले.

मी त्यांना मुळ पत्र दाखवले आणि आमचा पाठींबा एडीएमकेचे प्रमुख पलानीस्वामी यांना असल्याचे सांगितले. आमच्यासाठी पलानस्वामी हे मुख्यंत्रीपदाचे दावे आहेत. आमच्या पक्षाचा पाठींबा त्यांना आहे. दिनाकरन यांनी चेन्नईमधील गुइंडी पोलिस ठाण्यात विजय यांनी खोटे पत्र साजर केल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली.

टीव्हीकेने थेट व्हिडीओच दाखवला

दिनाकरन यांच्या आरोपानंतर टीव्हीकेने एक व्हिडिओ समोर आणला. त्यामध्ये दिनकर यांच्या पक्षाचे एकमेव आमदार एस कामराज हे स्पष्टपणे सांगत आहेत आहे की टिव्हीकेला समर्थन देण्याचा निर्णय हा दिनाकरन यांच्या सहमतीने घेण्यात आल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT