Political Crisis : तामिळनाडुच्या राजकारणात भूकंप! थलपतीला रोखण्यासाठी कट्टर शत्रू एकत्र येणार? DMK अन् AIDMK कडून राजकीय खलबतं

Tamilnadu Political Crisis DMK AIDMK Talks Trigger Political Storm : विजय थलपतीने तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली असून राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.
Tamilnadu Political Crisis; M. K. Stalin-Dravida Munnetra Kazhagam; All India Anna Dravida Munnetra Kazhagam (AIADMK)-Edappadi K. Palaniswami and vijay thalapathy
Tamilnadu Political Crisis; M. K. Stalin-Dravida Munnetra Kazhagam; All India Anna Dravida Munnetra Kazhagam (AIADMK)-Edappadi K. Palaniswami and vijay thalapathysarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. विजयच्या टीव्हीके पक्षाने सर्वात मोठा पक्ष बनत मोठं यश मिळवलं.

  2. बहुमत न मिळाल्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच निर्माण.

  3. DMK आणि AIADMK यांच्यात आघाडी चर्चांची शक्यता.

Tamilnadu Political Storm : दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या थलपती विजयच्या टीव्हीके पक्षानं तामिळनाडूत प्रस्थापितांची सत्ता उलथवून लावली आहे. एकट्या विजयने आपल्या पक्षाच्या तब्बल १०८ जागा निवडून आणल्या आहेत. तर सध्या त्याच्याकडे ११३ आमदारांचा पाठिंबा आहे. तर सरकार स्थापन करण्यासाठी ११८ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. अशातच त्याने काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्राच्या जोरावर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा केला आहे. यामुळे तोच मुख्यमंत्री होईल, लवकरच त्याचा शपथविधी होईल अशी चर्चा सुरु झाली असतानाच आता तामिळनाडुच्या राजकारणात भूकंपाची शक्यता आहे. येथे विजयला शह देण्यासाठी कट्टर विरोधक असणारे द्रमुक (DMK) आणि अण्णा द्रमुक (AIDMK) एकत्र येण्याची शक्यता आहे. सध्या हे दोन्ही पक्ष आघाडीसाठी चर्चा करताना दिसत आहेत.

विजय थलपतीने जरी सत्ता स्थापनेचा दावा केला असला तरी त्याच्याकडे बहूमत नाही. सध्या काँग्रेसने थलपतीला पाठिंब्याचे आश्वासन दिले आहे. तसेच पत्रही दिले आहे. विजयकडे स्वत:च्या पक्षाचे १०८ आणि काँग्रेसच्या पाच जागा आहेत. असे एकूण संख्या बळ ११३ झाले आहे. पण बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अजून किमान १० जागांची आवश्यकता असून बहूमताचा आकडा ११८ आहे. यामुळे विजयने काँग्रेसशिवाय डीएमकेचा सहकारी पक्ष असलेल्या व्हिसीके, डावे पक्ष, इंडियन यूनियन मुस्लिम लीग यांच्याकडेही पाठिंबा मागितला आहे.

एकीकडे विजयच्या टीव्हीकेला काँग्रेसने जरी पाठिंबा दिला असला तरी डावे पक्ष आणि आययुएमएलने पाठिंबा देण्यास आधीच नकार दिला आहे. तर व्हिसीकेनं अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. तर स्वत: विजय हा दोन जागांवर निवडून आल्याने त्याला एका जागेवर त्याला राजीनामा द्यावा लागेल. यामुळे टीव्हीकेचा आकडा हा १०७ वर येणार असून बहुमतासाठी इतर पक्षांची साथ घ्यावी लागणार आहे.

Tamilnadu Political Crisis; M. K. Stalin-Dravida Munnetra Kazhagam; All India Anna Dravida Munnetra Kazhagam (AIADMK)-Edappadi K. Palaniswami and vijay thalapathy
Thalapathy Vijay CM? तमिळनाडूच्या विधानसभा निकालात थलपती विजय जिंकला? TVK, Tamilnadu Result

दरम्यान आता तामिळनाडुच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप येईल अशा चर्चा रंगल्या आहेत. टीव्हीकेला बहुमतासाठी आकडा मिळत नसल्याने इतर पक्षांची साथ मागावी लागत आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी डीएमके आणि एआयडीएमके प्रयत्न करताना दिसत आहेत. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे दोन्ही पक्ष एकत्र येत विजय रोखण्यासाठी खलबतं करताना दिसत आहेत.

डीएमके आणि एआयडीएमके यांच्या युतीची चर्चा रंगली आहे. दोन्ही पक्षांकडून इतर समीकरणांची चाचपणी केली जात आहे. डीएमके आणि एआयडीएमके यांनी आघाडी केली तरी त्यांच्यासमोर देखील विजय थलपती प्रमाणेच बहुमताचा आकडा गाठण्याचे आव्हान असणार आहे. डीएमके आणि एआयडीएमके यांची युती झाली तरी बहूमत सिद्ध होत नाही. डीएमके आणि एआयडीएमके यांचे आमदार १०६ होतात. त्यामुळे बहूमताचा आकडा गाठण्यासाठी १२ आमदार लागतील, जे सध्या शक्य दिसत नाही.

तामिळनाडू विधानसभेत २३४ जागा असून बहुमताचा आकडा ११८ आमदारांचा आहे. टीव्हीकेकडे १०८ जागा जिंकल्या आहेत. पण दोन ठिकाणी विजय निवडून आला आहे. तसेच डीएमकेला ५९, एआयडीएमकेला ४७, काँग्रेसला ५, पीएमकेला ४ तर आययूएमएलला २ जागा मिळाल्या असून भाजप, एएमएमके, डीएमडीके यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

Tamilnadu Political Crisis; M. K. Stalin-Dravida Munnetra Kazhagam; All India Anna Dravida Munnetra Kazhagam (AIADMK)-Edappadi K. Palaniswami and vijay thalapathy
Tamilnadu Politics : दक्षिणेत कर्नाटकनंतर भाजपला मोठा धक्का ; 'एआयएडीएमके' एनडीएतून बाहेर

FAQs :

1. टीव्हीके पक्ष कोणाचा आहे
अभिनेता विजय यांच्या नेतृत्वाखालील पक्ष

2. टीव्हीकेला बहुमत मिळालं का
नाही, बहुमताचा आकडा गाठता आला नाही

3. सत्तास्थापनेत अडचण का आली
बहुमत नसल्यामुळे सरकार बनवणे कठीण झाले

4. कोणत्या पक्षांमध्ये आघाडीची चर्चा आहे
DMK आणि AIADMK यांच्यात चर्चा सुरू

5. पुढे काय होऊ शकते
आघाडी सरकार किंवा नवीन राजकीय समीकरण तयार होऊ शकते

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com