Navi Delhi News, 23 Nov : प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने २०१८ मधील मानहानीच्या प्रकरणात राठी यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. विकास पांडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने न्यायालयाने हा आदेश दिला.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनम रईस खान यांनी सोमवारी (२३ नोव्हेंबर) हा निर्णय दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. ध्रुव राठी हे आपल्या यूट्यूब व्हिडीओंच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर आणि निर्णयांवर टीका करत असतात. राजकीय घडामोडी, सरकारी धोरणे आणि विविध मुद्द्यांवर ते व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका मांडतात. अशाच एका व्हिडीओमुळे २०१८ मध्ये त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.
नेमकं प्रकरण काय?
मे २०१८ मध्ये ध्रुव राठी यांनी 'BJP IT Cell Part 2' नावाचा व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओमध्ये भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान (IT) विभागाने विकास पांडे यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. ध्रुव राठी यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरही शेअर केला होता. त्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवाल यांनीदेखील हा व्हिडीओ रीट्वीट केला होता. यानंतर विकास पांडे यांनी ध्रुव राठी आणि अरविंद केजरीवाल या दोघांविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
न्यायालयात समन्स बजावण्यात अडचणी
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान तक्रारदाराच्या वतीने वकील समक्ष शर्मा यांनी न्यायालयात बाजू मांडली होती. ध्रुव राठी हे बहुतांश वेळा परदेशात राहत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना समन्स बजावण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले होते.
दरम्यान, १२ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी करणारा अर्ज मंजूर केला होता. तसेच ध्रुव राठी यांना थेट समन्स बजावण्याचे आदेश दिले होते. आता न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे राठी यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.