Tejashwi Yadav, Lalu Prasad Yadav and Tej Pratap Yadav  Sarkarnama
देश

बिहारमध्ये 'यादवी'? लालूंच्या कुटुंबातील कलह आणखी वाढला

तेजप्रताप यांची पक्षाच्या पदाधिकाऱ्याला नग्न करुन मारहाण

सरकारनामा ब्युरो

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कुटुंबातील संघर्ष आणखी वाढण्याची चित्र आहे. लालूंचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप हे राबडीदेवींच्या निवासस्थानी राहायला आले आहेत. यावरून यादव कुटुंबामध्ये पुन्हा कलह होण्याची भीती त्यांच्या यादव कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे. तेजप्रताप यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला नग्न करुन मारहाण केल्याने बिहारच्या राजकारणात गदारोळ उडाला आहे.

पदाधिकारी मारहाण प्रकरणावरून गदारोळ वाढताच तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. आपल्या पदाचा राजीनामा वडिलांकडे सोपविण्याची तयारीही दर्शविली होती. मात्र, राज्य सरकारकडून मिळालेला बंगला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती. यानंतर काल सायंकाळी तेजप्रताप हे अचानक राबडीदेवींच्या निवासस्थानी पोचले. तेजप्रताप घरी परतल्याने यादव कुटुंबीयांमध्ये वाद आणखी वाढणार असल्याची चिन्हे आहेत. सध्या राष्ट्रीय जनता दलाची धुरा सांभाळण्याचे काम लालूंचे कनिष्ठ पुत्र तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हे करीत आहेत.

पक्षातील काही कार्यकर्त्यांनी तेजप्रताप यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर दोन भावांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. आरजेडीच्या युवा शाखेचे प्रमुख रामराज यादव यांनी तेजप्रताप यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. राबडीदेवी यांच्या निवासस्थानी नुकत्याच झालेल्या इफ्तार पार्टीमध्येच ही घटना घडल्याचा दावा रामराज यांनी केला होता. राबडीदेवी यांच्यासोबत तेजस्वी यादव हेसुद्धा त्यावेळी उपस्थित होते. तेजप्रताप यांच्या समर्थकांनी मात्र, हे आरोप फेटाळून लावले आहेत.

यावर अखेर आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंदसिंह यांना खुलासा करावा लागला आहे. तेजप्रताप यांच्यावर कारवाई करणे आपल्या हातात नसल्याची कबुली त्यांनी दिली आहे. ते म्हणाले की, रामराज यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग मला सांगितला आहे. मी त्याची नोंद घेतली आहे. दुर्दैवाने तेजप्रताप यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार माझ्याकडे नाहीत. ते आमच्या पक्षाचे फक्त आमदार नसून, प्रदेश पातळीवरील बडे नेतेही आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT