मुंबई : भाजपचे (BJP) आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्याविरोधात एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याचबरोबर नाईकांनी धमकावल्याची तक्रारही दाखल केली आहे. या प्रकरणात नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. यावरील सुनावणीवेळी गणेश नाईकांनी या महिलेशी प्रेमसंबध असल्याची कबुली दिली आहे. या अर्जावर न्यायालय उद्या (ता.28) निर्णय सुनावणार आहे. (Ganesh Naik News Updates)
नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्यांच्यावर धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये अटक टाळण्यासाठी नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. बलात्काराच्या गुन्हयात आधीच न्यायालयाने नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. आता धमकावल्याच्या गुन्ह्यात नाईकांनी केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. या वेळी गणेश नाईक यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळले. मात्र, गणेश नाईकांचे त्या महिलेशी संबंध होते, असे सांगितले. एवढे वर्षे प्रेम संबंध असतानाही आता असे आरोप करणे म्हणजे राजकीय दबाव व फायद्यासाठी केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. याचबरोबर 376 कलम लावण्यास त्यांनी आक्षेप घेतला आहे. न्यायालयाने जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालय यावर उद्या निर्णय सुनावणार आहे.
संबंधित महिलेच्या तक्रारीवरून नाईकांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी नाईकांना त्वरित अटक करा, असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी नवी मुंबई पोलिसांना दिले आहेत. महिला आयोगाने निर्देश दिले असले तरी नाईक यांना लगेच अटक करण्याची शक्यता नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकुमारसिंह यांनी फेटाळून होती. अद्याप नाईकांच्या अटकपूर्व जामिनावर निर्णय झाल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
संबंधित महिलेने याबाबत नुकतीच महिला आयोगाकडे तक्रार केली होती. तिने पोलिसांकडे तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने या महिलेने आयोगाकडे धाव घेतली होती. नाईक यांच्यासोबत असलेल्या संबंधातून आपल्याला पंधरा वर्षाचा मुलगाही असल्याचा दावा या महिलेने केला आहे. नाईक हे 1993 पासून माझे लैंगिक शोषण करत आहेत. त्यांनी लग्नाचे आमिष देऊन तसेच ठार मारण्याची धमकी देऊन माझे शोषण केले, असे या महिलेने म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.