Sonia Gandhi  Sarkarnama
देश

Sonia Gandhi : निकालापूर्वीच मुख्यमंत्री भूपेश बघेल अन् सोनिया गांधी यांच्यात सत्तेची खलबते

Discussion between Bhupesh Baghel and Sonia Gandhi : छत्तीसगड निवडणुकीमधील या मुद्द्यावर झाली चर्चा......

Sudesh Mitkar

Pune News : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये ३० मिनिटांपेक्षा जास्त काळ चर्चेची खलबतं सुरू होती. छत्तीसगडमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचा काँग्रेसला विश्वास आहे. त्यामुळे राज्यात बहुमत आल्यास पुन्हा सरकार स्थापन करताना कोणता दगाफटका तर होणार नाही ना, याची काळजी सध्या काँग्रेसला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचे बोलले जात आहे.

तसेच भूपेश बघेल यांनी सोनिया गांधी यांना राज्यातील दोन टप्प्यांतील मतदानाची माहिती दिली. पहिल्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला 20 विधानसभा जागांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात 17 नोव्हेंबरला 70 विधानसभा जागांसाठी मतदान झाले आहे. त्यामुळे संभाव्य निकालांबाबत काँग्रेस नेत्यांनी या वेळी चर्चा केली. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निकालापूर्वी सोनिया गांधी आणि भूपेश बघेल यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हायकमांडला दिली ही माहिती

मुख्यमंत्री भूपेश बघेल सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटण्यासाठी आले होते. सोनिया गांधींसोबतच भूपेश बघेल यांनी राहुल गांधी आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या दिल्ली दौऱ्याचा आज ( बुधवारी ) दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्री मंगळवारी दिल्लीत पोहोचले होते. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व 90 विधानसभा जागांचा अभिप्राय हायकमांडला दिला आहे.

या वेळी काँग्रेसने छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत 75 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. राज्यात विधानसभेच्या 90 जागा आहेत. कोणत्याही पक्षाला बहुमतासाठी 46 जागांची आवश्यकता असते. या वेळी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अनेक ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT