Shiv Sena MLA Disqualification : आता शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी ... 

Bharat Gogawale Shiv Sena MLA Disqualification case:ठाकरे गटाच्या वकिलांशी गोगावले, शेवाळेंचा सामना 
Shiv Sena MLA Disqualification Case
Shiv Sena MLA Disqualification CaseSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने साक्ष, पुरावे आणि प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त करण्यात आले असून, शिवसेना शिंदे गटाच्या जवळपास 5 आमदार आणि एका खासदाराची साक्ष नोंदवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये दोन्ही गटांना आपली साक्ष पुरावे आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आली होती. मात्र, शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे हे पुरावे सादर करण्यासाठी अधिकचा वेळ मागितला होता. आणि त्यानंतर 24 नोव्हेंबरला साक्ष, पुरावे आणि प्रतिज्ञापत्र शिवसेना शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले आहे. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shiv Sena MLA Disqualification Case
Shambhuraj Desai : राष्ट्रवादीला झटका, पाटणकर गटाला सोडचिठ्ठी देत कार्यकर्त्यांचा देसाई गटात प्रवेश 

आता यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून आमदार दीपक केसरकर, उदय सामंत, दिलीप लांडे, योगेश कदम, भरत गोगावले आणि खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Shiv Sena MLA Disqualification Case
Maruti Navale: 'सिंहगड'चे संस्थापक नवलेंच्या विरोधात गुन्हा दाखल ; पीएफ निधीत अपहार...

आता शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची उलट तपासणी होऊन साक्ष नोंदवली जाईल, ज्यामध्ये ठाकरे गटाची वकील त्यांना प्रश्न विचारतील, तर दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार आणि रेकॉर्डवर आलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या इतर पाच आमदार आणि खासदारांनासुद्धा विविध मुद्द्यांवर प्रश्न व उप प्रश्न ठाकरे गटाचे वकील करतील. 

अपात्रतेबाबत विधिमंडळत सुरू असलेल्या सुनावणीत शिंदे गटाकडून भरत गोगावले आणि मंत्री दीपक केसकर यांची फेर साक्ष होणार आहे. ज्या पद्धतीने शिवसेना उबाठा गटाचे प्रतोत सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली जात आहे. त्याचप्रमाणे शिंदे गटाकडून उदय सामंत, दिलीप लांडे यांचीही साक्ष नोंदवण्यात येणार असून, अपात्र ते बाबत सुनावणींचा आजचा पाचवा दिवस आहे. आज ही शिवसेना उबाठा गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली जाणार आहे

Shiv Sena MLA Disqualification Case
जिकडे मते तिकडे नेते ; 5 बाजार समित्यांतली interesting गणितं| Politics | Maharashtra | Sarkarnama

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com