Digambar Kamat
Digambar Kamat sarkarnama
देश

निवडणुकीनंतर गोव्यात काँग्रेसला पहिला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्रीच भाजपच्या वाटेवर

सरकारनामा ब्यूरो

पणजी : गोव्यात काँग्रेसला (congress) मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) हे पक्ष सोडून भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भाजप दिगंबर कामत यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या सरकारमध्ये ऊर्जामंत्री करणार असल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी मायकल लोबो यांची तर प्रदेशाध्यक्षपदी अमित पाटकर यांना नेमले. मात्र, निवडीच्या वेळी पक्षश्रेष्ठींनी आपल्याला विश्‍वासात घेतले नाही. या कारणास्तव कामत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पत्रक पाहूनच ही गोष्ट समजल्याने त्यांनी निकटच्या सहकाऱ्यांकडे बोलून दाखवले. काँग्रेस समर्थकांची दोन दिवसांपूर्वी कामत यांच्या निवासस्थानी बैठक झाली. मडगावच्या नेत्याने पक्षश्रेष्ठींना जाब विचारावा आणि या अपमानाचा बदला घेण्यासाठी आमदारकीचाही राजीनामा द्यावा, अशी भूमिका समर्थकांनी घेल्याची माहिती आहे.

यावेळी कामत यांनीही आपली व्यथा कार्यकर्त्यांसमोर मांडली. ते म्हणाले, मी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे हिमतीने काम केले. निधी गोळा करुन तो उमेदवारांना पोचवला. अनेक मतदारसंघांत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत सभा घेतल्या. या निवडणुकीत आक्रमकरीत्या पक्षाचे नेतृत्व करणे आवश्‍यक होते. मी त्याकामी किंचितही कमी पडलो नाही. तरीही पक्षश्रेष्ठींनी मला विश्‍वासात घेतले नाही.

पक्षाचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांनीच या प्रकरणात भूमिका बजावली. निवड जाहीर करण्यापूर्वी माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना दिल्लीला बोलावून घेण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. गोव्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून कामत आमदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. त्यांनी भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधला असल्याचीही चर्चा आहे. कामत यांच्या निकटवर्तीयांनी मात्र, या अफवा असल्याचे म्हटले आहे.

गोव्यात जवळपास १० वर्ष काँग्रेस सत्तेच्या बाहेर आहे. या काळात कामत ३ वर्ष विरोधी पक्षनेते होते. कामत हे गोव्यातील काँग्रेसचा चेहरा म्हणून ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये ते काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. मात्र, काँग्रेसला ११ जागांवरच समाधान मानावे लागले. भाजपला २० जागा मिळाल्या. अपक्ष व एमपीजीच्या मतदीने भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. पराभवानंतर मार्च अखेर काँग्रेसने गोव्यात अमित पाटकर यांची नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. तर कामत यांचा काँग्रेस कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT