पवार आणि मोदी भेटले पण लक्षद्वीपच्या मुद्यावरच जास्त बोलले...

पंतप्रधान मोदी - आणि शरद पवार भेटीने चर्चांना उधाण
Sharad Pawar, PM Narendra Modi
Sharad Pawar, PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मालमत्ता जप्त केल्याने राज्याचे राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील दोन (NCP) मोठे नेते तुरूंगात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे लागलेला आहे. अशातच आज दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं.

मात्र ही भेट प्रामुख्याने लक्षद्वीपच्या मुद्यावर असल्याचे शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. लक्षद्वीपमध्ये प्रशासक प्रफुल्ल के. पटेल यांच्याकडून स्थानिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या मुद्द्यावर आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान मोदींंची भेट घेवून आपण चर्चा केली असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल हे देखील उपस्थित होते.

Sharad Pawar, PM Narendra Modi
पंतप्रधान मोदी अन् पवारांमधील भेटीनंतर अजित पवार अन् जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

याशिवाय महाराष्ट्रीत राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या बाबतीत देखील चर्चा झाली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. राज्यपालांची तक्रार केली असून त्याबाबत पंतप्रधान मोदी विचार करुन योग्य तो निर्णय घेतली, असेही पवार म्हणाले. या सोबतच शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधातील कारवाईबाबत चर्चा झाली असून ही कारवाई कशासाठी याबाबतही आपल्यामध्ये चर्चा झाली असल्याचे पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar, PM Narendra Modi
राज ठाकरेंच्या नावाला काळं फासलं ; मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा चिघळला..

या व्यतिरीक्त महाराष्ट्रातील केंद्रीय तपाय यंत्रणांच्या कारवाया, नवाब मलिक यांच्याविरोधातील कारवाई किंवा अन्य कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. राष्ट्रवादी आणि शिवसेना सातत्याने भाजपविरोधात उभी आहे, असेही पवार यांनी ठामपणे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com