Ashok gehlot
Ashok gehlot Sarkarnama
देश

पक्षनेतृत्वाशी पंगा घेणे गेहलोतांना भोवणार : समर्थक आमदारांवरही कारवाई!

सरकारनामा ब्यूरों

नवी दिल्लीः राजस्थान काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांच्या गटातील तीन नेत्यांवर पक्ष निरीक्षकांकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील मुख्य व्हीप महेश जोशी, कॅबिनेट मंत्री शांती धारिवाल आणि आमदार धर्मेंद्र राठोड यांना काँग्रेसच्या शिस्तपालन समितीकडून नोटीस बजवण्यात आले असून, त्यांच्याकडून आता उत्तरं मागवण्यात आली आहेत.

या तीन्ही नेत्यांवर काही आरोप ठेवण्यात आले असून 10 दिवसांच्या आत त्याची उत्तरे द्या, असेही त्यांना बजावण्यात आले आहे. आपण सभागृहाचे संसदीय कामकाज मंत्री आहात, असे असतानाही पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहिला नाहीत. मात्र पक्षाव्यतिरिक्त वेगळ्या बैठकीचे तुम्ही आयोजन केले. त्यामुळे पक्षशिस्त आणि अनुशासनाचा भंग केला असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवत, स्पष्टीकरण देण्यात यावे, अशी समज देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने राठोड यांना जी नोटीस दिली आहे, त्यामध्ये म्हंटले आहे की, काँग्रेस पक्षाची अधिकृत विधीमंडळाची बैठक सुरु असताना, पक्षशिस्तीचा भंग करत तुमच्याकडून समांतर बैठक बोलवण्यात आली होती. तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, असा सवालही नोटीशीत विचारले आहे. या घटनेचे10 दिवसांत उत्तर देण्याची सुचनाही करण्यात आली आहे.

शिस्तपालन समितीने महेश जोशी यांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, तुम्ही मुख्य व्हीप आहात, तुमच्यासह सर्व आमदारांना पक्षाच्या अधिकृत बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. तरीही आमदारांच्या दुसऱ्या समांतर सभेत तुम्ही उपस्थित होतात. तुमच्यावर पक्षशिस्तभंगाची कारवाई का करण्यात नये, असाही सवालही आमदारांना विचारण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT