Pune Politics| भाजपच्या महाराष्ट्रातील लोकसभा प्रवास योजनेची सूत्रे आता मावळातून हालणार

Bala Bhegade| Maval Politics| देशातील १४४ लोकसभा मतदारसंघात २०२४ ला विजय मिळवण्याचा चंग भाजपने आतापासूनच बांधला आहे.
Pune Politics|
Pune Politics|

पिंपरी : विरोधी पक्षांचे खासदार असलेल्या राज्यातील १६ जागांसह देशातील १४४ लोकसभा मतदारसंघात २०२४ ला विजय मिळवण्याचा चंग भाजपने आतापासूनच बांधला आहे. त्याअंतर्गत भाजपच्या (BJP) केंद्रीय मंत्र्यांनी नुकतेच बारामती व शिरूरचे प्रत्येकी तीन दिवसांचे दौरे लोकसभा प्रवास योजनेत केले. आता या योजनेची राज्याची जबाबदारी (प्रदेश संयोजक) मावळचे माजी आमदार तथा माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यावर टाकण्यात आली आहे. तुळजाभवानी देवीचा नवरात्रात हा आशिर्वाद मिळाला असल्याची प्रतिक्रिया भेगडे यांनी या नियुक्तीवर आज `सरकारनामा`ला दिली.

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लोकसभा प्रवास योजनेचे प्रदेश संयोजकपद होते. मात्र,नुकतीच त्यांची भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदासाठी निवड झाली.त्यामुळे त्यांनी या पदी भेगडे यांची शिफारस केंद्रीय पक्ष नेतृत्वाला २१ सप्टेंबरला पत्राव्दारे केली होती. ती मान्य करीत पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी भेगडेंना नियुक्तीचे पत्र सोमवारी (ता.२६) दिले.

Pune Politics|
मुंबई महापालिका सदस्यसंख्येवरून भाजपा-शिवसेनेचा सुप्रीम कोर्टात सामना

संघटनात्मक पातळीवर ही मोठी संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,माजी प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रीचंद्रकांत दादा पाटील यांचे आभार मानत त्यांना भेगडेंनी धन्यवाद दिले आहेत.माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थकी लावून पूर्ण क्षमतेने पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेल,असे ते या नेमणुकीवर म्हणाले.तर, प्रदेश भाजपने बाळाभाऊंच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास व्यक्त केला असून ते निश्चित या जबाबदारीला न्याय देतील,असे भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सांगितले.

राज्यात झालेल्या विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देण्यात भेगडेंचा वाटा राहिलेला आहे.त्याजोडीने त्यांनी गोवा विधानसभा निवडणुकीतही त्यांच्यावर सोपविलेली कामगिरी अशीच पार पाडली आहे.एकूणच त्यांचे हे संघटनकौशल्य विचारात घेऊन पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोचविण्याकरिता भाजपने सुरु केलेल्या आपल्या महत्वाकांक्षी अशा लोकसभा प्रवास योजनेचीही महाराष्ट्रातील जबाबदारी आता त्यांच्यावर टाकली आहे. दरम्यान,या योजनेचा राज्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.दुसऱ्या टप्याची सुरवात आता शिवनेरीवर शिवरायांना अभिवादन करून करणार असल्याचे भेगडेंनी सांगितले.या टप्यात राज्यातील १६ मतदारसंघात नऊ केंद्रीयमंत्री येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com