IAS Divya Mittal Sarkarnama
देश

IAS Divya Mittal : IAS पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलेल्या दिव्या मित्तल अखेर राजकारणात येणार, काँग्रेस की भाजप? जाहीर केली भूमिका

Divya Mittal former IAS officer political entry : माजी IAS अधिकारी दिव्या मित्तल IAS पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राजकारणात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत जाणून घ्या.

Rashmi Mane

IAS पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर माजी IAS अधिकारी दिव्या मित्तल अखेर राजकारणात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. दिव्या मित्तल काँग्रेस किंवा भाजप यापैकी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून, सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन स्वतंत्र राजकीय मंच उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात उत्तर प्रदेशातून होणार आहे.

दिव्या मित्तल यांनी 30 ऑगस्ट 2026 रोजी 13 वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर IAS पदाचा राजीनामा दिला होता. वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांसह जीवनातील नव्या उद्दिष्टांचा उल्लेख त्यांनी राजीनाम्यामागील कारण म्हणून केला होता. त्यांचा राजीनामा 15 सप्टेंबर 2026 पासून अधिकृतपणे प्रभावी झाला. त्यानंतर त्या पुढे काय करणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू होते.

मात्र आता दिव्या मित्तल यांनी स्वतःच आपल्या पुढील वाटचालीचा खुलासा केला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या माध्यमातून राजकारणात येण्याऐवजी नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून स्वतंत्र राजकीय व्यासपीठ उभारण्याचा त्यांचा मानस आहे. जनतेच्या समस्या थेट मांडणे आणि त्या सोडवण्यासाठी राजकीय पातळीवर काम करणे, हा त्यांच्या नव्या प्रवासाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातून राजकीय प्रवासाची सुरुवात

दिव्या मित्तल यांनी उत्तर प्रदेशला आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करण्यासाठी निवडले आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना उत्तर प्रदेशातील जनतेशी आपले घट्ट नाते निर्माण झाले, असे त्यांनी सांगितले. “उत्तर प्रदेश माझ्यासाठी फक्त कर्मभूमी नाहीय. इथल्या लोकांनी मला कुटुंबाचा भाग मानलं,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

त्यांच्या मते, केवळ एखाद्या नेत्याला बदलून व्यवस्था बदलणार नाही. नागरिकांनी स्वतः पुढाकार घेतला आणि राजकारणाच्या पद्धतीत बदल घडवून आणला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. जाती, धर्म किंवा पैशाच्या समीकरणांपेक्षा नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासकीय सेवेत काम करताना त्यांना ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, शिक्षण, रस्ते, रोजगार आणि सरकारी यंत्रणेतील अडचणींचा जवळून अनुभव आला. या अनुभवाच्या आधारावर आता त्या जनतेसोबत काम करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे माजी IAS अधिकारी दिव्या मित्तल यांचा स्वतंत्र राजकीय मंच नेमका कसा आकार घेतो, कोणते मुद्दे ते प्राधान्याने मांडतात आणि उत्तर प्रदेशातील नागरिकांचा त्याला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT