Chakan Development Plan : चाकण-हिंजवडीचा कायापालट होणार; 1826 कोटींची तरतुद : जिल्हाधिकाऱ्यांनी मांडलेल्या आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

Chakan Hinjawadi infrastructure project update: चाकण-हिंजवडी परिसराच्या विकासासाठी 1826 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मांडलेल्या विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली.
Chakan Hinjawadi development budget 1826 crore
Chakan Hinjawadi development plan 1826 croreSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chakan Hinjawadi development project funding: चाकणमधील रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, पावसाळी पाणी निचरा व्यवस्थापन आदींच्या सुधारणांसाठी एक हजार ४०० कोटी रुपयांच्या, तर हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ४२६ कोटी रुपयांच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी तत्वतः मंजुरी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बैठकीत आराखड्याचे सादरीकरण केले.

Chakan Hinjawadi development budget 1826 crore
Someshwar election : 'सोमेश्वर'च्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बिनविरोधसाठी पडद्यामागे सूत्रं हलली...

चाकण येथील औद्योगिक परिसरात पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या गंभीर बनली आहे. या समस्येवर उपाय म्हणून नैसर्गिक नाले मोकळे करणे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था उभारणे, कल्व्हर्ट आणि पुलांची क्षमता वाढविणे तसेच आवश्यक ठिकाणी पाणी साठविण्याची व्यवस्था उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नाल्यांवरील अतिक्रमणे दूर करणे आणि ३८ किलोमीटर लांबीची रस्त्यालगतची पावसाळी गटार व्यवस्था उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

चाकण औद्योगिक परिसरातील एकूण ४९८ किलोमीटर रस्त्यांच्या जाळ्याचा अभ्यास करण्यात आला आहे. वाहतुकीची घनता, औद्योगिक महत्व, मालवाहतुकीची वर्दळ, रस्त्यांची स्थिती, पाणी साचण्याची समस्या, सुरक्षितता आणि जोडणी या निकषांवर रस्त्यांची निवड करण्यात आली आहे.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे ७५ किलोमीटर रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. या रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग, पावसाच्या पाण्याचा निचरा, वाहतुकीसाठी आवश्यक सुविधा आणि रस्त्यांची सुरक्षितता यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

चाकणमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून मोठ्या संख्येने कामगार आणि नागरिक येतात. त्यामुळे खासगी वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडी निर्माण होते. या समस्येवर उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरातून चाकणकडे जाणाऱ्या कामगारांसाठी मार्गनिहाय बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी विविध ठिकाणांहून सुमारे ५०० अतिरिक्त बसची नियोजन करण्यात येणार आहे. तसेच चाकण औद्योगिक परिसरात ‘एमआयडीसी’ने पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.

चाकण औद्योगिक परिसरातील पाणीपुरवठा योजनेचे काम २०२७ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्या चाकण इंडस्ट्री असोसिएशनमार्फत सुरू असलेली पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे (एमजीपी) सोपविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

वीजपुरवठ्यासाठी ‘एमआयडीसी’ने आवश्यक जागा उपलब्ध करून दिली असून, १०० एमव्हीए क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे काम डिसेंबरमध्ये सुरू करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्रीकृत प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. १४ गावे आणि दोन नगर परिषदांमधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा तयार करण्यात आल्या आहेत.

Chakan Hinjawadi development budget 1826 crore
MPSC Exam Postponed : MPSC परीक्षा अचानक पुढे ढकलली; विद्यार्थ्यांमध्ये खळबळ, पाहा नवीन तारीख अन् महत्त्वाचा बदल...

सुरळीत वाहतुकीसाठी हिंजवडीला ४२६ कोटी

हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ४२६ कोटी रुपयांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. हिंजवडीतील वीजपुरवठ्याच्या अडचणी दूर करण्यासाठी सहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० जवान उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. हिंजवडी परिसरातील कचरा व्यवस्थापनासाठीही पिंपरी-चिंचवड महापालिका किंवा पुणे महापालिकेच्या माध्यमातून कचरा संकलन सुरू करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com