DK Shivakumar Sarkarnama
देश

DK Shivakumar CM Karnataka : ‘’ हवं तर रक्ताने लिहून देतो, डिसेंबरपर्यंत शिवकुमार मुख्यमंत्री बनणार’’ ; काँग्रेस आमदाराचा दावा!

Karnataka Congress news : जर शिवकुमार यांना न्याय मिळाला नाही. तर काँग्रेस पक्षात राहणे व्यर्थ आहे, असंही काँग्रेस आमदाराने म्हटलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Karnataka Congress leadership : कर्नाटकात या वर्षाच्या अखेरीस राज्यात नेतृत्व बदल होणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. त्यात आता काँग्रेस आमदार बसवराज वी. शिवगंगा यांनी एक मोठा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार हे डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री होतील. एवढंच नाहीतर शिवकुमार डिसेंबरपासून पुढील साडेसात वर्षांपर्यंत मुख्यमंत्री राहतील, कारण पक्षाला पुढील विधानसभा निवडणुकीत विजयाची खात्री आहे. असंही शिवगंगा यांना म्हटलं आहे.

शिवगंगा यांनी सांगितलं की, हे म्हणणं लिहून ठेवा, डिसेंबरपर्यंत हे घडलेलं असेल. जर तुम्ही म्हणत असाल तर मी रक्तानेही लिहून देवू शकतो, की शिवकुमार हे डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री बनतील. जर ते डिसेंबरमध्येश पदभार घेत असतील तर ते पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासोबत प्रशासन चालवतील, त्यामुळेच एकुण ते साडेसात वर्षांपर्यंत मुख्यमंत्री राहतील.

आमदार शिवगंगा यांनी डी.के.शिवकुमार(DK Shivakumar) यांच्या पक्ष वाढीतील योगदानाचा उल्लेख करत म्हटले की, त्यांनी पक्षाच्या जागांची संख्या वाढवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यांनी म्हटले की शिवकुमार यांनी इतिहास रचला आहे. त्यांनी पक्षाला संघटित केले आहे. आपली संसाधने गुंतवली त्यासाठी खूप त्याग केला. त्यांच्या शांत राहण्यास त्यांची कमजोरी समजू नये. हायकमांड सर्वकाही जाणते आणि मला देखील शंभर टक्के खात्री आहे की ते डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री बनतील.

कर्नाटक काँग्रेसमध्ये(Congress) या वर्षांच्या अखेरपर्यंत रोटेशनल मुख्यमंत्री किंवा पॉवर शेअरिंग व्यवस्थेअंतर्गत नेतृत्व बदलाचे अंदाज वर्तवले जात आहेत. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदासाठी एक बलाढ्य दावेदार आहेत. ते आपल्या महत्त्वकांक्षेबाबत उघडपणे बोलले आहेत. शिवगंगा यांनी शिवकुमार यांच्यासाठी आपले समर्थन असल्याचे सांगत, म्हटले की त्यांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयात मी त्यांच्यासोबत राहील.

याशिवाय त्यांनी हेदेखील म्हटले की, जर शिवकुमार यांना न्याय मिळाला नाही. तर काँग्रेस पक्षात राहणे व्यर्थ आहे. त्यांच्या संघटनात्मक प्रयत्नांमुळेच ७५-८० नवीन आमदार निवडून आले आहेत. ते पक्षासाठी गरजेचे आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की हायकमांड त्यांना मुख्यमंत्री बनवेन. तसेच शिवगंगा यांनी हेही सांगितले की, शिवकुमार काँग्रेसच्या  ताकदीच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपद सांभाळतील, बाहेरून पाठिंब्याची आवश्यकता नसेल. हा आमचा अधिकार आहे, आम्ही तो मागू आणि हायकमांड त्यांच्या प्रयत्नांना मान्य करेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT