Kolhapur politics : वडील उद्धव ठाकरेंसोबत तर मुलगा मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्टेजवर; कोल्हापूरचं हटके राजकारण!

KP Patil and Ranjit Patil News : रणजीत पाटील हे पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचे असल्याचे सांगितले जाते. मात्र असे असेल तर विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महाविकास आघाडी सोबत होती असेही सांगितले जाते.
Ranjit Patil
Ranjit PatilSarkarnama
Published on
Updated on

FKP Patil son politics : विधानसभा निवडणुकीत पंधरा दिवसात तीन पक्ष बदलून राधानगरी विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेतून माजी आमदार के पी पाटील यांनी उमेदवारी मिळवली. उमेदवारीची अडचण झाल्यानंतर महायुतीमधून महाविकास आघाडीकडे पाटील यांचे पाय कधी वळले? त्यांना देखील समजले नाही. आज देखील ते महाविकास आघाडी सोबत असताना त्यांचे चिरंजीव गोकुळचे संचालक रणजीत पाटील मात्र महायुती सोबत राष्ट्रवादीच्या स्टेजवर उपस्थित होते. राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि सध्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात के पी पाटील यांनी शड्डू ठोकला होता.

विधानसभा निवडणूक(Vidhan sabha Election) लागण्यापूर्वी माजी आमदार के पी पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुती म्हणून माजी खासदार संजय मंडलिक यांना पाठिंबा दिला. मात्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची अडचण निर्माण झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेचा पर्याय स्वीकारला. शिंदे यांचे शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार व सध्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार के. पी. पाटील असा सामना निवडणुकीत रंगला. पाटील यांच्या प्रचारार्थ कृषी संचालक रणजीत पाटील यांनी देखील प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत के पी पाटील यांचा पराभव झाला.

Ranjit Patil
Devendra Fadnavis: इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण तापलं, कोल्हापुरात इंडिया आघाडी CM फडणवीसांना दाखवणार 'गनिमी कावा'

माजी आमदार के पी पाटील(K P Patil) यांनी सातत्याने राजकीय सोयीस्कर भूमिका घेतल्याचे दिसून येते. सध्या ते ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. दोन दिवसापूर्वी झालेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या बैठकीदरम्यान त्यांनी देखील उपस्थिती लावली होती. तर दुसरीकडे त्यांचे चिरंजीव रणजीत पाटील राष्ट्रवादीच्या पक्षीय कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत स्टेजवर दिसले. रणजीत पाटील हे पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचे असल्याचे सांगितले जाते. मात्र असे असेल तर विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महाविकास आघाडी सोबत असल्याचे देखील सांगितले जाते. त्यामुळे भूमिका नेमकी कोणच्या बाजूची ? हा सवाल उपस्थित होत आहे. किंवा हे जर राष्ट्रवादीत असतील तर महायुती म्हणून त्यांना राजकीय दृष्ट्या माजी आमदार के पी पाटील यांच्याविरोधी भूमिकेत रहावे लागणार आहे.

हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) हे राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात देखील ते महायुती म्हणून एकत्र कार्यरत आहेत. मात्र सहकाराच्या नियमावर बोट ठेवत त्यांनी महाविकास आघाडीसोबत आपले सूत बांधले आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यासोबत असलेला त्यांचा मैत्रीपूर्ण दोस्ताना त्यांच्याच पालकमंत्री पदाच्या निवडी वेळी आडवा आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचा दोस्ताना दिवसेंदिवस आणखी मजबूत होत असताना त्यांना काहीवेळा महायुतीमधील नेत्यांच्या देखील टीकेला तोंड द्यावे लागत आहे.

Ranjit Patil
Hasan Mushrif : अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षानेच टोचले मंत्री मुश्रीफांचे कान; म्हणाले, "आतातरी कागल सोडून..."

रविवारी राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळातील सदस्यांचा सत्काराचा कार्यक्रम पार पडला. तर याप्रसंगी स्टेजवर महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार के पी पाटील यांचे चिरंजीव गोकुळ दूध संघाचे संचालक रणजीत पाटील राष्ट्रवादीचे स्टेजवर दिसल्याने अनेकजण अवाक झालेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com