MK Stalin | Rahul Gandhi Sarkarnama
देश

DMK Support Delimitation : मोठी बातमी! डीएमकेचा डिलिमीटेशन विधेयकाला पाठींबा जाहीर, एम के स्टॅलिन यांनी स्पष्टच सांगितले,...

MK Stalin BJP : एम के स्टॅलिन यांनी सांगितले की, डीएमकेने दिलेल्या सातत्यपूर्ण संघर्षाचा विजय आहे! तामिळनाडूसह सर्व दक्षिण भारतीय राज्यांचा हा विजय आहे.

Roshan More

MK Stalin News : डिलीमीटेशन बिलाला डीएमकेने पाठींबा जाहीर केला आहे. आज पक्षाची बैठक चैन्नईत पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारच्या डिलीमीटेशन आणि महिला आरक्षण बीलाला DMK अध्यक्ष एमके स्टालिन यांनी पाठींबा जाहीर केला. या बैठकीत डीएमकेच्या सर्व खासदारांनी डिलिमीटेशन बिलाला पाठींबा दर्शवला आहे.

एम के स्टॅलिन यांनी सांगितले की, 'न्याय्य डिलिमीटेशनच्या मागण्यांचा समावेश असलेल्या विधेयकाला आम्ही पाठिंबा दिला आहे. गेल्या एप्रिल महिन्यात आम्ही ज्या दोन मागण्यांसाठी विधेयकाला विरोध केला होता, त्या मागण्यांचा नवीन विधेयकात लेखी स्वरूपात समावेश करण्यात आला आहे.'

'हा २०२४ पासून डीएमकेने दिलेल्या सातत्यपूर्ण संघर्षाचा विजय आहे! तामिळनाडूसह सर्व दक्षिण भारतीय राज्यांचा हा विजय आहे. १९७१ च्या लोकसंख्येच्या आधारावर सर्व राज्यांमधील मतदारसंघांची संख्या ५० टक्क्यांनी वाढवण्याची तरतूद असलेल्या या विधेयकाकडे दुर्लक्ष केल्यास काय परिणाम होतील, याचा आपण कोणतीही भावनिक प्रतिक्रिया न देता शांतपणे विचार केला पाहिजे.

या सर्व मुद्द्यांची सखोल छाननी केल्यानंतर, डीएमकेने आज आपल्या खासदारांच्या बैठकीत, प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी व्यवहार्य आणि आपल्यासाठी फायदेशीर असलेल्या या स्वरूपातील या विधेयकाला प्रक्रियेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT