BJP Bhandara : 'महायुती सरकारने आमदार खासदारांना महाराष्ट्र लुटायला मोकळीक दिलेय...'; भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

BJP Leader Vinod Bante on Farmer : "५ हजार रुपये देऊन सरकारने काही उपकार केलेले नाहीत. मी भारतीय जनता पार्टीचा नेता आहे. आपला जिल्हा दुष्काळग्रस्त आहे. आम्हाला भीक नको होती, हक्काचा बोनस पाहिजे होता. आम्हाला बोनस हवा होता. हे पैसे फेकून मारल्यासारखे दिवाळीला दिले."
BJP
BJPSarkarnama
Published on: 
Updated on: 

Bhandara News, 27 Nov : सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्याने भर कार्यक्रमात आपल्याच सरकारच्या शेतकरी धोरणांवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे जिल्हा परिषद गटनेते तथा माजी तालुकाध्यक्ष विनोद बांते यांनी महायुती सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला आहे.

'सरकार शेतकऱ्यांना मूर्ख बनवत आहे. आम्हाला भीक नको, आमच्या धानाला बोनस द्या,' अशा आक्रमक शब्दांत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. भंडारा तालुक्यातील बेलगाव येथे आयोजित मंडईच्या सार्वजनिक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बांते यांनी दुष्काळी मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीवर प्रश्न उपस्थित केले.

आमदार आणि खासदारांना कोट्यवधींचा निधी दिला जात असताना शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपयेच का, असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, "५ हजार रुपये देऊन सरकारने काही उपकार केलेले नाहीत. मी भारतीय जनता पार्टीचा नेता आहे. आपला जिल्हा दुष्काळग्रस्त आहे. आम्हाला भीक नको होती, हक्काचा बोनस पाहिजे होता. आम्हाला बोनस हवा होता. हे पैसे फेकून मारल्यासारखे दिवाळीला दिले. या सरकारने काही खूप उपकार केलेले नाहीत. सरकारने ५ हजार दिले पण तुमच्या गावातील विकासकामांवरही परिणाम होत आहे.

BJP
Maharashtra Congress : काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? महिला प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती अवघ्या 24 दिवसांत रद्द, राष्ट्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय

गावातील नाले, रस्ते आणि इतर विकासकामांना निधीअभावी मर्यादा येत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामांवर बंधने घातली. पंरतू, आमदार आणि खासदारांना रान मोकळं करून देण्यात आलं. जेवढा महाराष्ट्र लुटायला येतोय तेवढा लुटा अशी मोकळीक त्यांना दिली जात आहे. या शासनाच्या निर्णयाला मी भाजपचा सदस्य म्हणून निषेध करतो," अशा शब्दात त्यांनी सरकारच्या धोरणावर हल्लाबोल केला.

BJP
NCP Politics : पार्थ पवारांकडून राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांना धक्का? 5 महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या नेत्याची मुंबईच्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती

मात्र, राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती सरकार सत्तेत असताना भाजपच्याच एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने सरकारच्या निर्णयांविरोधात जाहीर भूमिका घेतल्याने या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेपेक्षा स्वपक्षातील नेत्यानेच सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केल्याने या नाराजीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, विनोद बांते यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भंडाऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.