Congress Sarkarnama
देश

Karnataka Assembly Election : ‘बंडखोरी करू नका; महामंडळाचे अध्यक्षपद देऊ...’ : संभाव्य बंडखोरांना काँग्रेसची ऑफर

काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटले नाहीत. पक्षाकडून घोषित केलेल्या यादीचे मतदारसंघातील कार्यकर्त्याकडूनही स्वागत झाले; मात्र दुसऱ्या यादीनंतर बंडखोरीचे ठिणगी पडली आहे.

सरकारनामा ब्यूरो

बेळगाव : काँग्रेसची (Congress) दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर कर्नाटक (Karnataka) राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघांत बंडखोरीची ठिणगी पडली आहे. त्यात बेळगाव जिल्ह्याचाही समावेश असून, चार मतदारसंघात इच्छुकांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. यामुळे पक्षाकडून चिंता व्यक्त केली जात असून, संभाव्य बंडखोर थोपविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उमेदवारी डावललेल्यांना पक्षाची सत्ता आल्यानंतर महामंडळाचे अध्यक्ष, सदस्यपद देण्याची ऑफर दिली जात आहे. (‘Do not rebel; Offer the post of President of Corporation...' : Congress's offer to potential rebels)

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर राष्ट्रीय, प्रादेशिक पक्षाकडून उमेदवारी निवडीच्या हालचाली सुरू आहेत. वेगवेगळ्या पातळीवर चाचपणी करून उमेदवारी अंतिम करण्यात येत आहे. काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटले नाहीत.

पक्षाकडून घोषित केलेल्या यादीचे मतदारसंघातील कार्यकर्त्याकडूनही स्वागत झाले; मात्र दुसऱ्या यादीनंतर बंडखोरीचे ठिणगी पडली आहे. इच्छुक उमेदवारांनी निर्णय बदलण्यासाठी पक्षावर दबाव गट सुरू केला आहे. समर्थकांनीही आंदोलन हाती घेतले आहे. त्यातून मतदारांची दिशाभूल होण्याची शक्यता गृहीत धरून तातडीने यासंदर्भात निर्णय घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून महामंडळाच्या अध्यक्षपद किंवा सदस्य पद देण्याची तयारी दाखवली आहे.

विधानसभेची निवडणूक घोषित झाल्यानंतर विविध सर्वेक्षणात काँग्रेस पक्षाला कौल दाखवला आहे. शिवाय पक्षाला चांगले यश मिळेल, असा दावा सर्वेक्षणाच्या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यासाठी उमेदवारांची चाचणी करताना संभाव्य सर्व बाबी पडताळण्यात येत आहेत, तरीही काही मतदारसंघात बंडखोरीची फटके पक्षाला बसण्याची शक्यता असल्यामुळे या स्वरूपाच्या मतदारसंघात पक्षाची सत्ता आल्यानंतर महामंडळाचे अध्यक्षपद किंवा महत्त्वाच्या महामंडळामध्ये सदस्यपद देण्याची ऑफर नाराज उमेदवारांना देण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT