Sangola News : सत्कारासाठी आयोजकांनी साळुंखेंचे नाव पुकारले; मात्र दीपकआबांनी प्रशांत परिचारकांसाठी आग्रह धरला...

एकमेकांच्या विरोधात विधान परिषद लढवलेले दोन पक्षातील नेतेमंडळी या संमेलनाच्या व्यासपीठावर दीर्घकाळ चर्चा करताना तर दिसले.
Deepak Salunkhe- Prashant Paricharak
Deepak Salunkhe- Prashant ParicharakSarkarnama

सांगोला : सांगोल्यातील (Sangola) राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर साहित्याबरोबर राजकीय नेत्यांच्या वैचारिक संस्कृतीचे दर्शनही घडत आहे. एकमेकांच्या विरोधात विधान परिषद लढवलेले दोन पक्षातील नेतेमंडळी या संमेलनाच्या व्यासपीठावर दीर्घकाळ चर्चा करताना तर दिसले. परंतु आयोजकांनी स्थानिक माजी आमदाराचे सत्कारसाठी नाव पुकारल्यानंतर त्यांनी आवर्जून आपल्या शेजारी बसलेले विरोधी पक्षाच्या माजी आमदाराचा अगोदर सत्कार करावा, असे स्टेजवरूनच सांगून तो करवूनही घेतला. (Deepak Salunkhe asked the organizers to felicitate the Prashant Paricharak before him)

साहित्य संमेलन म्हटले की साहित्यातील वैचारिकतेच्या ज्ञानाची मोठी देवाण-घेवाणच असते. आपल्या संस्कृतीचा वसा आणि वारसा जपला जावा, त्याची ठेवण पुढेही कायम राहावी, यासाठी साहित्य संमेलनासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सांगोल्यातील राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर साहित्याबरोबरच राजकीय नेत्यांच्या वैचारिक संस्कृतीचे दर्शन घडले.

Deepak Salunkhe- Prashant Paricharak
Dhangekar On Pune Loksabha By-Election : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत आमदार रवींद्र धंगेकर यांचे मोठे विधान....

संमेलन उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव, स्वागताध्यक्ष आमदार शहाजी पाटील, उद्‌घाटक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार लक्ष्मण ढोबळे व इतर अनेक विविध राजकीय पक्षातील नेतेमंडळी व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताच्या समारंभामध्ये उद्‌घाटक, प्रमुख पाहुणे यांचे स्वागत झाल्यानंतर राजकीय नेते मंडळींचे स्वागत सुरू झाले. विधान परिषद निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे आणि भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक हे शेजारी शेजारी बसले होते. व्यासपीठावर हे दोघे एकमेकांशी गप्पागोष्टी करण्यात दंग झाले होते.

Deepak Salunkhe- Prashant Paricharak
Pandharpur Ncp News : पंढरपुरात राष्ट्रवादीचे भविष्य भगीरथ भालके की अभिजित पाटील? : कळीच्या प्रश्नावर रोहित पवारांचे मौन

विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेली या दोघांमधील लढत जिल्ह्यात लक्षवेधी ठरली होती. परंतु साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर जवळ बसून हे दोघेही माजी आमदार एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले. स्वागत समारंभामध्ये पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या अगोदर सांगोल्यातील माजी आमदार दीपक साळुंखे यांचे सत्कारासाठी नाव पुकारले.

Deepak Salunkhe- Prashant Paricharak
#AskRohitPawar : ‘कर्जत-जामखेड’ने लढायला शिकवलंय...त्यामुळे कधीही कर्जत-जामखेडच : रोहित पवारांनी सांगितले आगामी निवडणुकीचे गणित

दीपक साळुंखे यांनी मात्र कार्यक्रमासाठी पंढरपूरहून आलेले माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा अगोदार सत्कार करावा, असे संयोजकांना सांगितले. ते तेवढ्यावरच थांबले नाही तर परिचारक यांचा सन्मान करवून घेतला. दीपक साळुंखेंनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आपल्या राजकीय वैचारिक संस्कृतीचे दर्शन घडवून दिल्याने त्याच चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com